NGN News
Latest Marathi News

राष्ट्रवादी कॉंग्रेस ( एपी ) विधी विभाग कार्याध्यक्षपदी नाशिकचे अभिजित कासार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाच्या मुंबई विधी ( लीगल ) विभागाच्या कार्याध्यक्षपदी ऍडव्होकेट अभिजित कासार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतेच कासार यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

पक्षवाढीसाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदर नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. ऍडव्होकेट अभिजित कासार हे मूळ नाशिक जिल्ह्यातील भगूरचे भूमिपुत्र असून, गेल्या दहा वर्षांपासून ते उच्च न्यायालयात वकिली करीत आहेत. अनेक महत्वाच्या केसेस त्यांनी हाताळल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री, नेतेगण, विधी, सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Comments are closed.