NGN News
Latest Marathi News

मुक्त विद्यापीठाचे अठरा विद्यार्थी ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अठरा विद्यार्थी जून २०२५ मध्ये झालेल्या ‘राज्य पात्रता परीक्षा’  – सेट (SET) उत्तीर्ण झाले आहेत. त्यात शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या एम.ए. शिक्षणशास्त्र शिक्षणक्रमाचेच तब्बल सतरा विद्यार्थी आहेत.

शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे सागर गणपत यादव, शंभूदेव वैजंती मुंढे, धनंजय पंडितराव कचवे आणि विठ्ठल बडे (लातूर) हरीश सोपान शिंदे व संपत बाळू ढोकळे (येवला – नाशिक), योगिता कारभारी राणे व अभयकुमार युवराज ठाकरे (धुळे), अमित रमेश वळवी (नवापुर), प्रा. योगेश वाळवी (नंदुरबार), मनोज वसंतराव खुळे (अमरावती), अश्विनी खुशालराव डाखोळे (यवतमाळ) आणि निलेश विश्वंभर जाधव (खामगाव – बुलढाणा), रवींद्र हनुमंत आटोळे (पुणे), अर्चना आप्पासाहेब जाचक (शिक्रापूर – शिरूर), प्रशांत भालचंद्र चिपकर (कुडाळ – सिंधुदुर्ग), रवींद्र मधुकर जोशी (जालना) आणि प्रा. रुपेश दुबे (दाहूर – बीड) आणि मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेच्या एम. ए. लोकप्रशासन विषयाचे विनोद भद्रे (नांदेड) यांचा यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांची पुस्तके ही विविध स्पर्धा परीक्षांसोबत ‘नेट’ (NET) आणि ‘सेट’ (SET) या परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवी मिळवण्यासोबतच या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची उत्तम संधी मिळते.

या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव श्री. दिलीप भरड यांच्यासह सर्व विद्याशाखा संचालक, विभागीय केंद्र संचालक आदींनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.