लाडशाखीय वाणी समाज धर्मदाय, शैक्षणिक मंडळ पंढरपूर संस्थेच्या वतीने उपक्रम
देवळा : महेश शिरोरे
ज्ञानासाठी प्रगती करणारा गुरुजनांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे रविवारी शैक्षणिक संकुल येथील , समृध्दी बॅक्कवेट हॉल येथे समाजातील ४०० शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण काशिनाथ शिरोडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त व्हॉईस ऍडमिरल सूनीलजी भोकरे, इस्रोचे शास्त्रज्ञ अविनाशजी शिरोडे, पुणे येथील उद्योजक मनोजजी शिरोडकर, ठाणे येथील उद्योजक भागवतजी वाणी हे होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून गुण गौरव सोहळ्यास सुरुवात करण्यात आली.
शिक्षण श्रेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या गुरुजनांचा गुणगौरव करून ४०० शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणगौरव करण्यात आला.गुजरात, मध्यप्रदेश, बडोदा, खेतीया, कल्याण, बदलापूर, पुणे ,मुंबई, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार ,नगर,डोंबिवली, पालघर, आदी जिल्ह्यातून शिक्षक उपस्थित होते.दातृत्वाने स्वतःहून शैक्षणिक संकुलात शिक्षकांनी देणगी देऊन एक शिक्षकांप्रतीचा वेगळा आदर्श निर्माण केला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतात भोकरे सरांनी शैक्षणिक संकुलातील सुविधा या अतिशय उत्कृष्ठ देणार हे बघुन शिक्षकांचा उत्साह वाखण्याजोगा आहे.शैक्षणिक संकुलाचे बांधकाम बघुन त्यात संकुलात दिल्या जाणाऱ्या सुविधा बघुन उपस्थित मान्यवरांनी आनंद व्यक्त केला. प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त विलास शिरोरे यांनी उपस्थित शिक्षकांचे मन गहिवरून आले असे प्रास्ताविक करून एक वेगळा आदर्श निर्माण केला.
दिव्यांग शिक्षक प्रकाश मालपुरे हे स्वतः वॉकर वरती येऊन त्यांनी सन्मान स्विकारल्या नंतर सर्व संस्थेच्या सदस्यांना गहिवरून आले. पुणे येथील बांधकाम व्यावसायिक अनिल चितोडकर ,नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक चैत्रबंध प्रकल्पाचे सचिन पी बागड , आशापुरी केटरर्स चे संचालक अमर वाणी, यांनी या सोहळ्याचे प्रायोजकत्व स्वीकारले होते.
या सोहळ्यास डॉक्टररेट पदवी मिळविलेले ३५ शिक्षक सन्मानारर्थी शिक्षक उपस्थित होते. तर 53 शिक्षक पती पत्नी या दोघांनी एकत्र येऊन आपला सन्मान व्यासपीठावर स्वीकारला. तसेच सर्वच स्तरातील शिक्षक गुण गौरव सोहळ्यास होते.
गुगल लिंक द्वारे राज्यातील शिक्षकांची नोंदणी करण्यात येऊन माहिती घेण्यात आली होती.अप्रतिम अश्या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. सूत्रसंचलन हर्षल कोठावदे, व दिपाली दलवेलकर मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षण समितीचे अध्यक्ष जी पी वाणी यांनी केले.
या सोहळ्यासाठी संस्थेचे सचिव विलास शिरोरे, उपाध्यक्ष बी टी बधान, ॲड राहुल खुटाडे, मिलिंद शिरोडे, खजिनदार संजय मालपुरे, निंबा जगन्नाथ सोंनजे, विनोद कोठावदे, पी टी नानकर, रमेश पांडुरंग मुसळे, सुशील बागड, निलेश मकर, प्रशांत बागड, मनोज कोतकर, सुरेश बागड,सुरेश मुसळे, शरद मोराणकर, अनिल शिंनकर,दिपक मालपुरे, महेश शिरोरे, देवा मुसळे, विजय शिंनकर,वसंत येवले, दिलीप पाटकर, आदिनसह शिक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते. सोहळा आटोपल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला हा गुणगौरव सोहळा यशस्वितेसाठी विलास शिरोरे, महेश शिरोरे, रमेश मुसळे, वासुदेव मुसळे यांनी अतोनात परिश्रम घेतले.
Comments are closed.