NGN News
Latest Marathi News

चालू वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण रविवारी; चंद्र लालसर तपकिरी रंगाचा दिसणार

नवीन नाशिक : दिलीप कोठावदे

येत्या रविवार, दि.७ सप्टेंबर रोजी चालू वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण असून हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. खगोलशास्त्र अभ्यासकांसाठी आणि सामान्य लोकांसाठीही ही एक दुर्मिळ संधी आहे. यानंतरचे पुढील चंद्रग्रहण थेट ३ मार्च २०२६ रोजी होईल.

रविवारी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी ग्रहणास सुरुवात होईल. त्यानंतर रात्री १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत येईल ही खग्रास ग्रहण स्थिती असेल. या वेळी पौर्णिमेचा तेजस्वी पुर्णचंद्र लालसर तपकिरी रंगाचा दिसेल, रात्री १२ वाजून २३ मिनिटांनी ग्रहण सुटण्यास सुरुवात होईल आणि उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी संपेल. हे चंद्रग्रहण कोणतीही साधने न वापरता फक्त डोळ्यांनी पाहता येणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधूनही दिसणार आहे.

Comments are closed.