- ‘मेरकी फुड्स’ ब्रान्डचे ५०० मोदक पोहचले मंत्रालयात
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
विघ्नहर्ता गणराय आणि मोदक हे समीकरण अवघ्या जगभर ज्ञात आहे. गणेशोत्सवात घरगुती असो की सार्वजनिक गणेश मंडळे, मोदकाचा प्रसाद हमखास मागवला जातो. त्यातही उकडीचे मोदक म्हणजे खवय्यांचा खास आवडीचा पदार्थ. नाशकात तब्बल दोन दशकांपासून खवय्यांसाठी उकडीचे मोदक तयार करणाऱ्या अशाच एका लघुद्योजिकेची रेसिपी थेट मंत्रालयात पोहोचली. ‘मेरकी फुड्स’ नामक ब्रान्डचे तब्बल ५०० मोदक राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची पसंती ठरली.
नाशिकच्या राजीवनगर भागात वास्तव्याला असलेल्या ज्योती कुटे यांनी ‘मेरकी फुड्स’ या ब्रान्डने विविध पदार्थ विक्रीस सुरुवात केली. त्यामध्ये उकडीचे मोदकांचाही समावेश आहे. दरवर्षी त्यांच्या मोदकांना मोठी मागणी असते. यंदा मंत्रालयाशी संबंधित एका परिचिताने त्यांना ५०० मोदकांची ओर्डेर दिली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत त्याचे वाटप करायचे असल्याने कुटे यांनी दोन महिला सहकाऱ्यांच्या सहाय्याने निर्धारित वेळेत मोदक तयार करून दिले. आकर्षक बॉक्समध्ये मोदक मंत्रालयात पोहोचवण्यात आले. तेथील अनेक बड्या अधिकाऱ्यांना त्याचे वाटप झाले. त्यामधील बहुतेकांनी मोदकांचा दर्जा आणि चव याबाबत मुक्तकंठाने प्रशंसा केली. नाशिकमधील अनेत सार्वजनिक मंडळानी या ब्रान्डच्या मोदकांना पसंती दिल्याची माहिती ज्योती कुटे यांनी दिली.
——-
@ मंत्रालयात उकडीचे मोदक तयार करून देताना गुणवत्ता टिकवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यासाठीची रेसिपी गुलकंद आणि विड्याचे पान अशा दोन फ्लेवर्समध्ये तयार करण्यात आली. एका बॉक्समध्ये सोळा अशा संख्येत मोदक भरून ते मंत्रालयापर्यंत पाठवण्यात आले. अनेकांना मोदक तयार करण्याची पद्धत आणि चव आवडल्याचे कळल्याने समाधान वाटले. कधीकाळी कुटुंब आणि मैत्रिणीसाठी तयार करण्यात आलेल्या या मोदकांनी आज मोठी ओळख निर्माण करून दिलीय, याचा अभिमान वाटतो.
- ज्योती कुटे, ‘मेरकी फुड्स’, नाशिक
Comments are closed.