NGN News
Latest Marathi News

‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रम स्तुत्य; नाशिककरांनो, सहभागी व्हा : खांडकेकर

माहितीपत्रकाचा प्रकाशन सोहळा : युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी झाल्याचे गौरवोद्गार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून राबविण्यात येत असलेला “देव द्या, देवपण घ्या” ! हा स्तुत्य उपक्रम असून नाशिककरांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अभिनेता अभिजीत खांडकेकर यांनी केले आहे.

देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत नाशिककरांमध्ये जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकाचा प्रकाशन सोहळा अभिनेता अभिजीत खांडकेकर यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी शहरातील प्रथितयश डॅाक्टर राजेंद्र आभाळे हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. त्याप्रसंगी अभिजीत खांडकेकर बोलत होते.
सुविचार मंचच्या माध्यमातून युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी होत आहे हे कौतुकास्पद असल्याचे देखील अभिनेता अभिजीत खांडकेकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी अभिनेते अभिजीत खांडकेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार, प्रतिथयश डॅाक्टर राजेंद्र आभाळे, देव द्या, देवपण घ्या उपक्रमाचे संयोजक आकाश पगार, सागर बाविस्कर यांची भाषणे झाली.
प्रास्ताविकात संयोजक आकाश पगार यांनी सुविचार मंच तर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व त्यावर केलेले रासायनिक रंगांचे रंगकाम यामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण होत राहते. गोदावरी नदीचे हे जलप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करणाऱ्या या माहितीपत्रकांचे घराघरात वाटप करण्यात येणार आहे. तसेच देव द्या, देवपण घ्या ! ह्या उपक्रमाची युवकांकडून मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.


पाच दिवस व सात दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्तींचे संकलन देखील करण्यात येणार आहे. गेल्या चौदा वर्षांपासून देव द्या, देवपण घ्या ! हा उपक्रम राबविला जात असून यंदाचे पंधरावे वर्ष आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी ९४२१५६३५५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक आकाश पगार यांनी तर विशाल गांगुर्डे यांनी आभार मानले. सुत्रसंचालन सागर बाविस्कर यांनी केले.

यावेळी जीत मोरे, राहुल अढांगळे, रामराव पाटील, योगेश निमसे, राहुल मकवाना, संकेत निमसे, सोनु जाधव, तुषार गायकवाड, मदन म्हैसधुणे, अविनाश बरबडे, कुणाल सानप, अक्षय नेर, महेश मंदाले, अमोल भांड, प्रणाली शिंदे, गौरी घाटोळ, योगेश माळोदे, रोहित जाधव, निशांत शिंदे, आकाश ढोले, हेमंत खैरणार, किरण जाधव, ओम खैरणार, राहुल काळे, भावेश खैरणार, संतोष देवरे, योगेश सोनवणे, सुरेंद्र शिंदे, युवराज कुरकुरे, गणेश सोनवणे, विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

       

        

        

Comments are closed.