NGN News
Latest Marathi News

भाक्षीचे सुपुत्र अमित रौंदळ यांना आरटीओ इन्स्पेक्टर पदावर पदोन्नती

सटाणा : श्रीकांत रौंदळ

बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत रौंदळ यांचे चिरंजीव श्री. अमित श्रीकांत रौंदळ यांना आरटीओ इन्स्पेक्टर ( क्लास वन) या पदावर पदोन्नती मिळाली आहे. दरम्यान मुंबई सेंट्रल येथील आरटीओ कार्यालयात दाखल होऊन त्यांनी पदाचा कार्यभार हाती घेतला आहे.

अमित रौंदळ यांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सटाणा येथील अभिनव बाल विकास मंदिर येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असून माध्यमिक शिक्षण मराठा इंग्लिश स्कूल मध्ये घेतलेले आहे. सटाणा महाविद्यालयातून बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कै. बाबुराव ठाकरे इंजीनियरिंग कॉलेज मधून मेकॅनिकल इंजिनियर ची पदवी संपादन केली आहे. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उच्चश्रेणीत उत्तीर्ण होऊन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून 2018 स*** त्यांची नियुक्ती जळगाव येथे करण्यात आली होती. त्यानंतर गोंदिया येथे दोन वर्षापासून सेवेत कार्यरत असताना नुकतीच त्यांना मोटार वाहन निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली आहे.

दरम्यान राज्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या 331 अधिकाऱ्यांना मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती मिळालेली आहे. त्यात अमित रौंदळ, चेतन देवरे, अनिकेत गुंजाळ ( बागलाण) सुरेश शिंदे निलेश अहिरे मोहन शिंदे ( मालेगाव) आदींचा समावेश आहे. त्यांचे धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, डॉक्टर दिनेश बच्छाव, माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर विलास बच्छाव, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश देवरे ,बहुजन वंचित आघाडीचे दादा खरे , भाक्षी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच चेतन वनीस, उपसरपंच भास्कर पाटील व ग्रामपंचायत सदस्य मनोज खैरनार तुकाराम बच्छाव रावण पवार सामाजिक कार्यकर्ते आबा रौंदळ संदीप बागुल ,सौरभ सोनवणे मयूर वाघ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.