NGN News
Latest Marathi News

घोटीत गणरायाच्या स्वागताला वरुणराजाची हजेरी; दिवसभर रिपरिप

वाद्यांच्या गजरात घोटीत मंगलमूर्तीची स्थापना; महागाईमुळे सामान्यजन नाराज; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

घोटी : राहुल सुराणा

“गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया ” अशा जोरदार घोषणा, ढोल-ताशांचा गजरात गुलालाची उधळण करीत आज मोठ्याप्रमाणात घोटी शहरात गणेश मूर्तींची भक्तिभावाने व विधीवत स्थापना करण्यात आली . सार्वजनिक मंडळाबरोबरच घरगुती गणेश स्थापना करण्यात आल्या . गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने संपूर्ण घोटी नगरी दुमदुमली . दिवसभर भक्तीचा चांगलाच उत्साह होता.  

      आज सकाळपासूनच गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त असल्याने गणेश भक्तांची धावपळ वेगळीच होती , घोटी शहरातील वासुदेव चौकात सिद्धिविनायक मंदिरातील श्रीगणेशाची महाआरती करण्यात आली , यावेळी घोटीच्या बाजारपेठेत श्रीफळ , हार , फुले , गणेश पूजनाचे साहित्य व आरास साहित्य खरेदीसाठी गर्दी होती , सकाळपासूनच घरगुती गणेश मुर्त्यांची स्थापनाची लगबग सुरु होती , घोटी बाजारपेठेतून मुर्त्या नेण्यासाठी वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ चालू होती , ढोल ताश्यांचा गजर होता , गुलालाची उधळण होती , घोटी शहराबाबरोबर ग्रामीण भागातून मुर्त्या नेण्यासाठी गर्दी झाली होती . वासुदेव चौक , जैन मंदिर , श्रीरामवाडी, चौदा नंबर नाका व मारुती मंदिर परिसर हा गजबजून गेला होता .गणपती बाप्पा मोरया हा गजर दिवसभर चांगलाच चालू होता . सार्वजनिक गणेश मंडळानी दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत महाकाय मूर्ती घेऊन जात होते. , घोटीत निर्माण केलेल्या व विक्रीसाठी आलेल्या हजारो मुर्त्याची विक्री झाल्याने विक्रेत्यामध्ये समाधानाचे वातावरण होते .परंतु श्री च्या मूर्तीची व पूजेच्या साहित्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्यजणांनी नाराजी व्यक्त केली. यावर्षी घोटी शहरात श्री च्या मूर्तीचे दुकाने मोठ्या प्रमाणात होती तसेच मुर्त्यांची प्रमाण सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या.  

      राज्यासह इगतपुरी तालुक्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी व सामान्य जनतेत आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे गणेश उत्सवाची धूम चांगली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये मात्र गणेश भक्ती , गणेश पूजनाचा महापूर ओसंडून वाहत होता . गणपती बाप्पाच्या स्थापनेस कुठेही उणीव दिसत नव्हती ,

    घोटी शहरात दिवसभरात घरगुती गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आल्या तर सार्वजनिक मंडळानी दुपारी सुद्धा गणेश मूर्तींची स्थापना केली. सकाळ पासूनच गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी व घरी नेण्यासाठी भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती . शहर व ग्रामीण भागातून गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी वाहनाचा वापर वाढल्याने शहरात ठिकठिकाणी पावलोपाली वाहतूक ठप्प ची वाहतूक समस्या भेडसावत होती . जैन मंदिर परिसरात तर ही समस्या गंभीर दिसली. तर काही मंडळानी व घरगुती भक्तांनी वाद्यांच्या गजरात गणेश मूर्तींचे स्वागत करून घरी स्थापना केली. 

——————————-

बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. व खाली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्यामुळे जवळपास दिवसभर वाहतूक कोंडी असल्याने सर्व सामान्य चे व गणेश भक्तांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या प्रयत्न केला.    

Comments are closed.