NGN News
Latest Marathi News

भाजप-दोन्ही राष्ट्रवादीच्या डझनभर नेत्यांकडे ९६ नवीन मद्य परवाने.. कोणाचा आरोप ?

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीन पक्षांमधील अवघ्या एक डझन नेत्यांना तब्बल ९६ मद्य परवाने प्राप्त होणार आहेत. हे परवाने या नेत्यांच्या संबंधित घरात जाणार आहेत. भाजपच्या पाच नेत्यांकडे तब्बल ४० परवाने जाणार आहेत. त्यामुळे ‘एकच प्याला’ नव्हे तर ‘तीन पक्ष प्याला’ अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. 

राज्य सरकारी महसूल वाढवण्यासाठी फडणवीस सरकारकडून नवीन वाईन शॉप परवाने देण्यात येत आहेत. हे वाईन शॉप परवाने महसूल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात नवीन धोरण आणले आहे. मात्र, या धोरणामध्ये मोजकेच नेते गब्बर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अजित पवार यांना या समितीचे अध्यक्ष ठेवणे अयोग्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

१०८ तालुके मद्यविक्री दुकानांविना

दुसऱ्या एका माहितीनुसार, राज्यातील १०८ तालुक्यांमध्ये मद्यविक्रीचे एकही दुकान नाही. मात्र, आता महसूलवाढीच्या दृष्टिकोनातून दुकानांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचा सरकारवर स्पष्ट तणाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिन्याला निधीची तरतूद करताना राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर निधी वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध मार्गातून प्रयत्न सुरू आहेत.

Comments are closed.