NGN News
Latest Marathi News

लासलगावात एसटी बसटंचाई; ७३ फेऱ्या रद्द, प्रवाशांचे हाल

लासलगाव : राकेश बोरा

गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांच्या सोयीसाठी लासलगाव आगाराच्या तब्बल २२ एसटी बस मुंबई व ठाणे येथे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र याचा फटका ग्रामीण व शहरी प्रवाशांना बसणार आहे.

लासलगाव आगाराकडून दिवसभरात एकूण ४२ बसच्या माध्यमातून १२२ फेऱ्या होत असत. मात्र बस कमी झाल्याने तब्बल ७३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून फक्त काही निवडक मार्गांवरच गाड्या धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसत आहे २७ ऑगस्ट रोजी गणपतीची प्रतिष्ठापना असून, २८ ऑगस्टपर्यंत हीच टंचाई कायम राहणार असल्याची माहिती आगारातून मिळाली आहे. ग्रामीण भागातील लोकांना शहरात जाण्यासाठी व विद्यार्थ्यांना शाळा-काॅलेजसाठी प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Comments are closed.