नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अंतर्गत नाशिक जिल्हा महानुभाव समिती यांच्यावतीने महानुभाव पंथाचे संस्थापक व मराठी भाषेचे आद्य प्रणेते भगवान श्री चक्रस्वामी अवतार दिन तथा जयंती महोत्सव व सत्कार सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ते २८ ऑगस्ट दरम्यान या निमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अंतर्गत नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने गेल्या ५६ वर्षापासून अखंडपणे भगवान श्री चक्रस्वामी अवतार दिन तथा जयंती उत्सव साजरा केला जातो. जयंती उत्सवाचे यंदाचे ५७ वर्ष आहे.
यानिमित्त अवतार दिन महोत्सव आयोजक समितीच्या वतीने श्री दत्त मंदिर मोजे सुकेणे येथे सोमवार , दि. २५ रोजी ६ वाजता पहाटे देवास मंगलस्नान , ऊटी , विडा अवसर , गितापाठ होणार आहे. ९ वाजता ध्वजारोहण होणार असून जयंती सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष महंत सुकेणकर बाबा यांच्या हस्ते यांच्या श्री सुखदानीबाबास विडा अवसर , पूजन , आरती , उपहार उपस्थितीत होणार आहे . तर मंगळवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ वा. श्री चौरंगी विद्या स्थान , कोणार्कनगर येथे प. पू. अंकुळणेरकर बाबा यांचे कथा निरूपण स्थान होणार आहे . बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता आडगाव येथील श्री चक्रस्वामी मंदिर ते श्रीपंचकृष्ण लॉन्स , कोणार्कनगर पर्यंत श्री मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी श्रीचक्रधर गोप मंडळ ,खेरवाडी तसेच संत महंत व सदभक्त यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर रात्री आठ वाजता प .पू. मंहत प्रभाकर बाबा कपाटे (भोकर नांदेड ) यांचे जाहीर कीर्तन होणार आहे . यावेळी साथ संगत जिव्हाळे ,आडगाव व ब्राह्मणवाडे येथील भजनी मंडळ करणार आहेत.
मुख्य अवतार दिन जयंतीचा मुख्य कार्यक्रम धर्मसभा व सत्कार सोहळा गुरुवार दि. २८ ऑगस्ट रोजी होणार असून पहाटे ६ वाजता देवास मंगल स्नान , श्रीमद्भगवद्गीता पाठपारायण , सकाळी ९ वाजता ध्वजारोहण , त्यानंतर सभा मंडप उद्घाटन , महंत परमपूज्य आत्याबाईची (छत्रपती संभाजी नगर ) यांच्या हस्ते होणार असून सकाळी ९.३० वाजता धर्मसभा, व्याख्यान सत्र व सत्कार सोहळा होणार असून सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत कारंजेकर बाबा उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी दीप प्रजनन होईल, व्याख्यान सत्रात महंत मुधोव्यास बाबा शास्त्री ( वरोरा, चंद्रपूर ) , भागवताचार्य महंत चिरडे बाबा (निफाड) , महंत तळेगावकर बाबा शास्त्री (साळवाडी , पुणे ) यांच्या व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे प्रकाशन सोहळा व माजी आमदार बाळासाहेब यांच्या हस्ते आहे संत , महंतांचा सत्कार सोहळा होणार आहे. त्यानंतर १२ व वाजता विडा अवसर ,महापूजा, आरती व उपहार अधिक कार्यक्रम होणार आहेत. याप्रसंगी विशेष उपस्थिती मंहत कापूसतळणीकर बाबा (फलटण) आणि मंहत कृष्णराज बाबा पंजाबी ( शिक्रापूर ) हे उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातील मंत्री ,खासदार , आमदार तसेच राजकीय पदाधिकारी ,भक्तगण ,मान्यवर यांनी महानुभाव पंथातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत , अशी माहिती आचार्य प्रवर महंत सुकेनेकर बाबा शास्त्री यांनी दिली.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक व संयोजक आचार्य प्रवर महंत सुकेणेकरबाबा शास्त्री (अध्यक्ष) , अर्जुनराज आप्पा सुकेणेकर (कार्याध्यक्ष) , बाळकृष्ण नाना सुकेणेकर (सहकार्याध्यक्ष) , गोपीराज शास्त्री सुकेणेकर , गोविंदराज बाबा अंकुळनेरकर , राजधरदादा सुकेणेकर तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप, नाशिकरोड देवळाली व्यापारी सह. बँकेचे चेअरमन दत्ताजी गायकवाड , प्रकाशशेठ ननावरे, उदयभाऊ सांगळे, प्रभाकर आप्पा भोजने, किरण मते, नंदूभाऊ हांडे, अनिल जाधव, दौलतराव मोरे ,बाळासाहेब टर्ले , बाळकृष्ण अंजनगावकर ,पंडितराव पागेरे , प्रभाकर कातकाडे लालजी पागेरे तसेच जिल्हा निवासी सर्व संत महंत तथा अनुयायी आहेत .
Comments are closed.