नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कळवण येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक बाजीराव शंकर पगार यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सिन्नर, निफाड, बागलाण, पेठ, कळवण तालुक्यात ग्रामसेवक म्हणून सेवा दिली. मरणोत्तर त्यांचे नेत्रदान करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असून मालेगाव मर्चंटस् बॅंकेच्या विद्यमान चेअरमन सौ. मनिषा देवरे, कळवण येथील प्रगतिशील शेतकरी जयवंत पगार तसेच नाशिक येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल तुषार पगार यांचे वडील होत.
Comments are closed.