रोटरी नाईन हिल्सच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सामाजिक बांधिलकी जोपासून वंचित व दीनदुबळ्यांची सेवा करणाऱ्या रोटरीसारख्या संस्थांच्या मदतीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सदैव तत्पर आहे,असे उद्गार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी काढले.
रोटरी क्लब नाईन हिल्स नाशिकचे नूतन अध्यक्ष कैलास सोनवणे,सचिव अजय चव्हाण व धीरेंद्र वाघ आणि कोषाध्यक्ष शर्मदा गोखले यांचा पदग्रहण सोहळा गंगापूररोडवरील हॉटेल पगेसिस येथे पार पडला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोनवणे बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील,रोटरीचे सह प्रांतपाल राजेंद्र मामुणकर,मावळते अध्यक्ष वैभव चावक आदी होते.
रोटरीचे कार्य उल्लेखनीय आहे. महात्मा फुले यांचा वारसा खऱ्या ही संस्था जोपासते असे अभिमानाने नमूद करून सामाजिक बांधिलकी म्हणून मुक्त विद्यापीठाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती कुलगुरूंनी विशद केली.गोदा स्वच्छतेसाठी विद्यापीठाने एक कोटीची तरतूद केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. उद्योग क्षेत्रात कुशल कामगारांची असलेली 40 टक्के तूट भरून काढण्यासाठी 2500 अभ्यासक्रमांद्वारे आगामी तीन वर्षांमध्ये एक लाख कुशल कामगार निर्माण करण्याचा मानस व्यक्त करतांनाच कामगारांच्या उन्नतीसाठी ‘एआय’चा वापर कसा करता येईल याचा विचार सुरू आहे. नव्याने होऊ घातलेल्या वाढवण बंदराला कुशल कामगार देण्याचे काम विद्यापीठ करेल,असेही त्यांनी पुढे नमूद केले.
एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी पदाची जबाबदारी खूप मोठी आहे.येथे काम करण्यास खूप वाव आहे. रोटरीबरोबर संयुक्तरीत्या काय काम करता येईल त्याचा विचार आपण नक्की करू.रोटरीतर्फे हाती घेण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यासाठी दानशुरांकडून जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल त्यादृष्टीनेही पावले उचलली जतील,असे प्रमुख पाहुणे दीपक पाटील यांनी आपल्या भाषणात नमूद केले. रोटरीत मोठ्या प्रमाणात नेतृत्व विकसित होत असल्याने या संस्थेत येण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते असे आपल्या मनोगतात नमूद करून रोटरीचे सह प्रांतपाल राजेंद्र मामुणकर यांनी नूतन प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या संदेशाचे आपल्या खास शैलीत वाचन केले.
रोटरी क्लब नाईन हिल्स नाशिकच्या अध्यक्षपदाची धुरा आली ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. रोटरीच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण आपले सर्वस्व पणास लावू, असे नूतन अध्यक्ष कैलास सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सत्कारास उत्तर देताना सांगितले. कुंभमेळ्याचे समन्वयक महंत भक्ती चरणदास महाराज यांनी नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. मावळते अध्यक्ष वैभव चावक यांनी त्यांच्या कारकिर्दीचा अहवाल सादर केला व आपला पदभार नूतन अध्यक्षांकडे सादर केला.
शपथ घेणाऱ्या अन्य कार्यकारणी सदस्यांमध्ये मोहन काकळीज,आशा पगार,प्रकाश ब्राह्मणकर, विश्वास शिंपी, विजय जोशी, प्रेरणा बेळे, नरेंद्र शालिग्राम, अभय नेरकर, ललित पगार, विराज गडकरी,डॉ.सचिन शिंदे,सौमिल चिटणीस, डॉ.सचिनकुमार पाटील, संगीता काकळीज, हर्षद बेळे, अनघा जोशी,दीपक चौधरी,प्रकाश प्रधान, धनंजय बेळे यांचाही समावेश होता.
कार्यक्रमास माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख, पद्माकर पाटील, हेमंत खोंड, दिगंबर धुमाळ, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.