घोटी : राहुल सुराणा
इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका असून दरवर्षी सरासरी पेक्षा जास्त किंवा सरासरी इतका पाऊस या तालुक्यात होत असतो. क्वचित पावसाने या तालुक्याला दगा दिला आहे. या तालुक्यातील पावसाच्या जोरावरतीच अर्धा महाराष्ट्राला पाणी जाते व पाणी पुरवले जाते. विशेषता जायकवाडी धरण, मुंबईसाठी वैतरणा धरण, नाशिकसाठी मुकणे धरण ,दारणा धरण इत्यादी धरणाचे पाणी महाराष्ट्राच्या विविध भागात पोहोचते.
यावर्षी मे महिन्याच्या अवकाळी पावसाने तसेच जुन, जुलै महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच धरणांनी शतकी टप्पा पार करून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला व त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याच्या साठ्याची टक्केवारी उत्कृष्टरित्या असल्यामुळे अनेक जणांना पुढच्या दृष्टीने हायसे वाटले.
परंतु 31 जुलै संपताच एक ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले असून निसर्गाच्या या बदलामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे जून जुलै च्या अति पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांना भाताची पेरणी, आवणी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. एक ऑगस्ट पासून एक दोन वेळा सोडल्यास भुरभुर पावसाचेच आगमन फक्त झाले असून पंधरा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण घटले आहे .
पिकाच्या दृष्टीने व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पावसाची गरज असल्याने निसर्गाच्या या लहरीपणामुळे पुढे पावसाचे प्रमाण कसे राहील तिची साशंकता अनेकांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.