नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त महावितरणच्या नाशिक परिमंडल येथील विद्युत भवन कार्यालयाच्या आवारात १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी महावितरणच्या सर्व ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अधिक्षक अभियंता राजेश थुल, देवेंद्र सायनेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, महेश बुरंगे, कार्यकारी अभियंते योगेश निकम, अनिल झटकरे, नंदकिशोर काळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, व्यवस्थापक हेमंत भामरे आणि जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांच्यासह अभियंते, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments are closed.