NGN News
Latest Marathi News

इंजि. सिध्दार्थ धारणे यांची चित्रकलेद्वारे स्वातंत्र्यदिनास मानवंदना

त्र्यंबकेश्वर : एनजीएन न्यूज नेटवर्क

  भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सर्वत्र पहावयास मिळत आहे. हर घर तिरंगा उपक्रमाद्वारे ठिकठिकाणी राष्ट्रभक्तीचा जागर होत आहे. येथील युवा चित्रकार डाॅ. इंजि. सिध्दार्थ धारणे यांनी भारतातील वन्यजिवांचे मनमोहक असे दहा पेंटींग्ज काढुन आपल्या कलेद्वारे आगळ्यावेगळ्या पध्दतीने स्वातंत्र्यदिनास मानवंदना दिली आहे.

भारतातील वन्य जीवन हा देशाचा अभिमान आहे. वास्तविक पहाता वन्य जिवांमुळेच निसर्गाचे रक्षण होते. मात्र वन्यजिव अवयवांच्या तस्करीसाठी त्यांची हत्या केली जाते. वन्यजिवांच्या संवर्धनासाठी जगा आणी जगु द्या चा संदेश आर्टिस्ट सिध्दार्थ धारणे यांनी दहा अत्यंत मनमोहक पेंटीग्जद्वारे दिला आहे.

Comments are closed.