नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार दि. १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान ‘अँटी रॅगिंग सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे शहरातील म्हसरूळ येथील एस.एस. धामणकर महाविद्यालयात विशेष जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात म.वि.प्र. संस्थेच्या विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य, ॲडव्होकेट डॉ. संध्या गडाख यांचे विशेष व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी. वाघचौरे होते.
आपल्या व्याख्यानात ॲड. डॉ. संध्या गडाख यांनी रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांचे व संबंधित लोकांचे करिअर, प्रसंगी कुटुंब कसे उध्वस्त होते यावर उदाहरणांसहित प्रकाश टाकला. तसेच रॅगिंगचा अर्थ, त्याचा इतिहास, रॅगिंगविरोधी कायदे आणि शिक्षेच्या तरतुदींवर सखोल माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून उपकुलसचिव मनोज घंटे यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. एस. आर. निकम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. श्रीमती एस. एन. चोपडेकर यांनी सूत्रसंचलन केले तर श्री. अंकुश गोधडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी श्रीमती हेमांगी पाटील, गोरख पवार, अमोल पाटील, शरद सोनावणे, निवृत्ती बोटे, शरद पाटील, महेश कसबे, लोकेश पगारे, श्रावण कसबे आणि तुषार बच्छाव यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापाक व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed.