NGN News
Latest Marathi News

लासलगावला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीवर कारागीर फिरवताहेत अखेरचा हात

लासलगाव : राकेश बोरा

 लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिले असून लासलगाव येथील रसाळ आर्ट या गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मुर्त्यांवर कारागीर अखेरचा हात फिरवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कारखान्यात एक ते 14 फुटापर्यंत गणरायाच्या मुर्त्या तयार केल्या जात असल्याने लासलगाव परिसरासह नाशिक, अहिल्यानगर, धुळे आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गणेश मंडळे येथून गणरायाची मूर्ती घेऊन जात असतात. त्यामुळे आता लासलगावचे नाव कांद्याबरोबर  लाडक्या बाप्पाच्या मुर्त्या तयार करण्याच्या कामामुळे राज्यात झाले आहे .

सन 1893 पासून लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून राज्यासह देशात तसेच विदेशातही लाडक्या बाप्पाचे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला आगमन होते आणि अनंत चतुर्दशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. असा हा नऊ ते दहा दिवसांचा गणेशोत्सव सोहळा गणेश भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामुळे हिंदू धर्मामध्ये या गणेशोत्सवला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

गणेशोत्सव सोहळ्यासाठी लासलगाव येथील रसाळ आर्ट या गणपती कारखान्यात गेल्या 36 वर्षापासून नवरात्र मेहनत घेत लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई यासह इतर रूपातील गणरायाच्या मुर्त्या बनवण्याचे काम सुरू आहे या मुर्त्यांवर मोहक रंग चढविणे, गणपतीच्या अंगावरील दागिन्यांवर बारीक कलाकुसर करणे आदी कामे पश्चिम बंगाल येथील कारागीर मोठी मेहनत घेऊन करत असतात त्यामुळे या सुंदर आकर्षक मुर्त्या खरेदी करण्यासाठी दोन महिने अगोदर पासूनच लगबग या ठिकाणी पाहायला मिळते घरगुती गणेश मूर्ती घेण्यासाठी या ठिकाणी बुकिंग करण्यासाठी एक महिना अगोदरपासूनच सुरुवात झाली असल्याचे या कारखान्याच्या संचालिका सुशीला रामदास रसाळ सांगत आहे.

——————————
श्वेता मालपाणी : गणेश भक्त हिंदू धर्मामध्ये गणरायाच्या पूजनाला प्रथम महत्त्व दिलेला आहे आणि या गणरायाचे आगमन लवकर होणार आहे यासाठी आपल्या आवडीची लाडक्या बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे प्रत्येक मूर्ती बघितली तर त्यावर केलेले बारीक कलाकुसर चे काम मनमोहन घेणारे आहे या ठिकाणी आम्ही अनेक गणरायाच्या मुर्त्यांचे फोटो आमच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले 

Comments are closed.