NGN News
Latest Marathi News

स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान कोणाला ? हा निर्णय झाला..

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने येत्या स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, नाशिकमध्ये गिरीश महाजन हेच ध्वजारोहण करणार आहेत. यामुळे होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

चालू वर्षाच्या प्रारंभी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली होती. त्यामध्ये नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, संख्याबळ आणि गत अनुभव या निकषांवर महाजन यांच्या नियुक्तीवर अनुक्रमे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने महायुतीत अधिक तणाव निर्माण होवू नये म्हणून महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती.  तेव्हापासून नाशिकचे पालकमंत्रीपद अजूनही रिक्त आहे. चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये ध्वजारोहण कोण करणार, अशी उत्सुकता असताना आता त्याचे उत्तर सामान्य प्रशासन विभागाने देवून महाजन यांनाच तो मान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments are closed.