नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील बी .वाय .के. कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य दिनानिमित्त दोन दिवसीय पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते . हे दोन दिवसीय प्रदर्शन महाविद्यालयाच्या ढेकणे हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. ह्या प्रदर्शनामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थांनी उद्योजकता संबधित ई कॉमर्स , ई बँकिग यावर पोस्टर तयार केले होते.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सुवर्णा कदम यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले . तसेच त्यांनी परीक्षक म्हणून देखिल काम पाहिले. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना भट व उपप्राचार्या , डॉ काणे यांनी प्रदर्शनास सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना मार्गदर्शन केले. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ही प्रदर्शनास सदिच्छा भेट देऊन आपले कौतुकास्पद अभिप्राय नोंदविले.
या दोन दिवसीय प्रदर्शनात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा . प्रविण मुळे तसेच पर्यवेक्षक प्रा. प्रकाश निकम, प्रा .डॉ . स्नेहा रत्नपारखी प्रा .शितल जाधव तसेच वाणिज्य शाखेच्या सर्व शिक्षकांनी अतिशय मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला तसेच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशस्ती पत्रके देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल . अशी माहिती उपप्रा चार्य व पर्यवेशक यांनी दिली .
Comments are closed.