NGN News
Latest Marathi News

ओझर येथे ९ ऑगस्ट रोजी लक्षवेधी रक्षाबंधन सोहळा

ओझर : अमर आढाव

ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे शनिवार ( दिनांक ९ ) रोजी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरिजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत राखी पौर्णिमा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाऊ बहिणीचे स्नेह वृद्धिंगत करणाऱ्या या सोहळ्यात भाऊ बहिणींनीचा पारंपरिक पद्धतीने लक्षवेधी रक्षाबंधन उत्सव साजरा केला जाणार आहे.

निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या परंपरेनुसार उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने जय बाबाजी भक्त परिवार देव, देश, धर्मासाठी आणि भारतीय सांस्कृतीच्या रक्षणासाठी अविरत कार्य करत आहे.श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम व पर्यावरण संवर्धनासाठी देखील भक्त परिवाराचे मोठे योगदान आहे. भक्त परिवाराच्या वतीने बहीण भाऊ यांच्या नात्यातील गोडवा वाढावा यासाठी ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे शनिवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज व संत महंतांच्या उपस्थितीत ब्रह्मवृंदांच्या पवित्र मंत्र घोषात “रक्षा बंधन” उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा प्रारंभ पहाटे ५ वाजता नित्य नियम विधी,आरती, सत्संगाने होईल.सकाळी ८.३० वाजता पालखी मिरवणूक संपन्न होईल.सकाळी १०.३० वाजता रक्षा बंधन सोळ्यास प्रारंभ होणार आहे. ब्रह्मवृदांच्या मंत्र घोषात उपस्थित सर्व बहिणी भावांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची आणि यशस्वी वाटचालीसाठी प्रार्थना करणार आहे. भाऊ देखील बहिणीच्या रक्षणाचा संकल्प करणार आहे.अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात संस्कार, एकोपा आणि सामाजिक ऐक्याचे जिवंत दर्शन घडविले जाणार आहे.
कार्यक्रमानंतर सर्व सहभागी भावंडांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

नात्यातील गोडवा वाढण्यासाठी सोहळ्याचे आयोजन

@ अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने या रक्षा बंधन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राखी हे नात्याचे प्रतीक असून त्यामागे प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचा भाव आहे. आजच्या युगात या मूल्यांचा वारसा जपणे आवश्यक आहे.
_ विवेकानंद महाराज
प्रवक्ते,जय बाबाजी भक्त परिवार

Comments are closed.