NGN News
Latest Marathi News

ग्रामीण बस सेवेबाबत काळजी घेऊ : लासलगाव आगार प्रमुख काळे 

भाजप पदाधिकाऱ्यांना दिले आश्वासन

लासलगाव : राकेश बोरा

ग्रामीण भागातील बस वेळापत्रका संदर्भात वारंवार होणाऱ्या तक्रारी तसेच विद्यार्थी व इतर प्रवाशी वर्गाचे होणारे हाल अश्या अनेक प्रश्नाबाबत भविष्यात विशेष काळजी घेतली जाईल असे आश्वासन लासलगाव आगार प्रमुख सविता काळे यांनी लासलगाव मंडळ भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

लासलगाव बस आगारातील विविध समस्या सह विद्यार्थी व दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला वेळेवर नियमित बस सेवा उपलब्ध करण्यात यावी या मागणी संदर्भात मागे काही दिवसापूर्वी भाजपा लासलगाव मंडळ यांच्या वतीने लासलगाव आगार प्रमुखांना तसेच सामाजिक कार्यकर्ते शहेजाद पठाण यांनी विभागीय परिवहन आयुक्त नाशिक यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.या निवेदनाची दखल घेत आगार प्रमुख सविता काळे यांनी लासलगाव मंडळ भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती 

या वेळी लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रका नुसार नियोजन करणे,विद्यार्थ्यांसाठी जादा बसचे नियोजन करणे,एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी वर्गासोबत व्यवस्थित बोलून बस फेऱ्या बाबत माहिती देणे,ग्रामीण भागात वेळेवर बस फेऱ्यांचे नियोजन करणे यासह अनेक प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.या सर्व समस्यांबाबत भविष्यात विशेष काळजी घेतली जाईल असे आश्वासन आगारप्रमुख सविता काळे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले 

या वेळी भाजप लासलगाव मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे,नाशिक जिल्हा महामंत्री स्मिता कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चाफेकर, भाजपा मार्गदर्शक शंतनु पाटील,रवी होळकर, मंडल उपाध्यक्ष योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कराड, शहेजाद पठाण, मीरान पठाण, युनूस तांबोळी, गणेश निकम, अनिल भागवत, नलिनी शिंदे, रियाज शेख, योगेश हिंगमीरे व परिसरातील प्रवासी उपस्थित होते.

Comments are closed.