NGN News
Latest Marathi News

नाशिक जिल्हा केटरिंग असोसिएशन अध्यक्षपदी वैशाखी सोनार बिनविरोध

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक जिल्हा केटरिंग असोसिएशनच्या (NJCA) अध्यक्षपदी एस आर केटरर्सच्या वैशाखी संदीप सोनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऋग्वेद एसी बँक्वेट हॉल येथे पार पडली. त्यावेळी पदाधिकारी निवड घोषित करण्यात आली.

याप्रसंगी उपाध्यक्षपदी जलपा आमनकर ( देशपांडे केटरर्स ), सचिवपदी संदीप सोनार ( एस आर केटरर्स ), खजिनदारपदी मंदार तगारे ( आपलीच सेवा केटरर्स ) आणि सहसचिवपदी भास्कर दिंडे ( वक्रतुंड केटरर्स ) यांचीही एकमताने निवड झाली.

मागिल कार्यकारिणीच्या बैठकीत प्रस्तावित नविन कार्यकारिणीच्या अंमल बजावणी केली गेली. संस्थेचा अहवाल सचिव संदीप सोनार यांनी सादर केला. तसेच आर्थिक अहवाल खजिनदार मंदार तगारे यांनी सादर केला. मागिल कार्यकारिणीच्या बैठकीत प्रस्तावित नविन कार्यकारिणीच्या सूचनेची अंमलबजावणी केली गेली.

त्यानुसार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजूभाई व्यास यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. नवीन कार्यकारणीला पुढील वर्षाकरिता कार्य करण्याकरता शपथ व पदग्रहण समारंभ राजूभाई व्यास यांच्या हस्ते देण्यात आले. संस्थेचे सल्लागारपदी मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष राजू भाई व्यास यांची तर कमिटी सदस्य म्हणून अविनाश जोशी यांची निवड झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार स्वागत अध्यक्ष राजू भाई व्यास गुड्डी केटरर्स यांनी केला. आभार प्रदर्शन जलपा अमनकर यांनी केले.

यावेळी संस्थेचे सभासद एडवोकेट.मनोज जोशी, दिनेश आमणकर, श्रीकांत निरगुडकर, अल्केश पाटील, राज शर्मा, पुनाराम महाराज, सत्यपाल जोशी, दलपत महाराज, भागवत, पांडुरंग धनापुणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले. तसेच संस्थेच्या पुढील वाटचाली संदर्भात देखील चर्चा झाली. 26 सप्टेंबर केटरर्स दिनाच्या निमित्ताने पुढील मिटींगचे आयोजित स्वामीनारायण मंदिर येथे करण्यात येणार आहे . कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली.

Comments are closed.