नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
प्रक्रिया करून पाणी नदीत सोडले जाते की नाही ते बघण्याची सूचना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर भूमिका घेण्याची सूचना आज येथे केली. प्रसंगी एसटीपी प्लांटवर धाडी टाका, असे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत. जिल्ह्यातील उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत मुंडे बोलत होत्या. बैठकीत उद्योजक समस्या, प्रदूषण वाढीची कारणे तसेच उपाययोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, उद्योगाला जपून पर्यावरण रक्षण करायची जबाबदारी सर्वांची आहे. रेड झोनसारख्या वेगवेगळ्या झोनमध्ये प्रदूषण कमी करणे आवश्यक आहे. आपण वापरत असलेल्या पाण्या पैकी केवळ ४८ टक्के पाणी ट्रीट होते. याचाच अर्थ ५२ टक्के पाणी वाया जाते. उद्योजकांना सुविधा पाहिजे, ही माफक अपेक्षा असते. प्रदूषण नियंत्रणासाठी जे प्रकल्प उभे करायचे, त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. त्यापैकी काही प्रयत्न उद्योग विभागाकडून करावे लागतील. पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नसल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
स्वच्छतेसाठी शाश्वत उपाययोजना करा
सीएसआर फंडातून ज्या प्रकारे मंदिर, शिक्षण अथवा तत्सम कारणासाठी फंड उभे करण्यात येतात, तसा पर्यावरणासाठी निधी उभा होतो का हे अधिकाऱ्यांनी बघावे. आगामी सिंहस्थ काळात साधू-महंत जिथे डुबकी मरतील ते पाणी स्वच्छ असले पाहिजे. कुंभमेळा काळात यावेळी मोठ्या संख्येने लोक येतील. त्यामुळे स्वच्छतेसाठी शाश्वत उपाययोजना केल्या पाहिजेत.
Comments are closed.