विंचूर : मच्छिंद्र साळुंके
विंचूर शहरातील अनेक भागातील विविध प्रमुख रस्त्यावर मोकट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट जनावरांमुळे प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरांच्या झुंडी ठाण मांडून असल्याने वाहनधारक पादचारी त्रस्त झाले आहेत. अनेक प्रमुख भागातील यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
मोकाट जनावरांमुळे सातत्याने अपघाती होत आहेत तसेच लहान मुले यांच्यावर हल्ले होत आहेत. विंचूर ग्रामपालिका प्रशासनाने मोकाट जनावरे पकडण्याची व दंडाची मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विंचूर शहरातील ग्रामपालिका, जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थ नगर, बाजारपेठ बजरंग मंडळ, नेहरू चौक ,मारवाडी पेठ ,अशा वेगवेगळ्या भागातील रस्त्यावर जणू काही जनावरांचे साम्राज्य असल्यासारखी परिस्थिती असते त्यामुळे वाहन चालकासह पायी चालणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे तरी विंचूर ग्रामपलिका प्रसाने लवकरात लवकर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी विंचूर ग्रामस्थांनी केली आहे
Comments are closed.