NGN News
Latest Marathi News

डॉ. अश्विनी बोरस्ते यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव; मान्यवरांकडून अभिनंदन

नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, लहुजी मागासवर्गीय विकास मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. अश्विनी अशोकराव बोरस्ते यांना समाजातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

डॉ. बोरस्ते यांचे महिला सक्षमीकरण, सहकार चळवळ, ग्रामीण महिलांना स्वावलंबी करण्यासाठीचे योगदान आणि समाजात नेतृत्व निर्माण करणाऱ्या बचत गट चळवळीतील त्यांचे कार्य समाजासाठी आदर्श ठरले आहे. या बाबींची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. अश्विनी बोरस्ते यांचे कार्य म्हणजे सामाजिक बांधिलकी, संवेदनशील नेतृत्व आणि महिला सक्षमीकरणाच्या चळवळीतील ठोस योगदानाचे प्रतीक आहे. जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनी, संदेश व माध्यमांद्वारे डॉ. अश्विनी बोरस्ते यांचे अभिनंदन दिले. त्यामध्ये जिल्हा पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, नारायण वाजे, दीपक महाजन, बापूसाहेब गायकवाड, रसिया शेख, जयश्री दळवी, निर्मला सातभाई, प्रतिभा मस्के यांचा समावेश आहे.

भीमराव मरसाळे, दिलीप मरसाळे, तुळशी मरसाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Comments are closed.