NGN News
Latest Marathi News

मला भागवतांना अडकवण्याचे आदेश होते..माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट

 मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

‘भगवा दहशतवाद’ सिद्ध करण्यासाठी मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात समाविष्ट करण्यात आले होते आणि रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे थेट निर्देश देण्यात आले होते, असा गौप्यस्फोट माजी एटीएस अधिकाऱ्याने केला आहे. संबंधित आदेश तत्कालीन मालेगाव स्फोटाचे मुख्य तपास अधिकारी परमबीर सिंग आणि त्यांच्या वरिष्ठांनी दिले होते, असा खळबळजनक खुलासाही त्यांनी केला आहे.

सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावला बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर गुरूवारी एनआयए विशेष न्यायालयाने या प्रकरणात मोठा निकाल दिला. मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितसह सातही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. याच निकालानंतर आता एटीएसच्या माजी अधिकाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवृत्त निरीक्षक मेहबूब मुजावर म्हणाले, भगवा दहशतवादाचा सिद्धांत खोटा होता, मला मोहन भागवतांना अडकवण्याचे आदेश देण्यात आले होते. मोहन भागवत यांना अटक करण्यास सांगण्यात आले, जेणेकरून हा स्फोट ‘भगवा दहशतवाद’ आहे हे सिद्ध होईल, असे ते म्हणाले.

@ ज्या संशयितांना मारण्यात आले होते ते संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा यांना आरोपपत्रात जाणूनबुजून जिवंत दाखवण्यात आलं होते. ते मृत असूनही मला त्यांचे ठिकाण शोधण्याचे आदेश देण्यात आले होते. जेव्हा मी या गोष्टींचा निषेध केला आणि कोणतेही चुकीचे काम करण्यास नकार दिला तेव्हा माझ्यावर खोटे खटले लादण्यात आले. खोटे खटले दाखल केले, पण मी निर्दोष सिद्ध झालो.

  •  मेहबूब मुजावर, निवृत्त निरीक्षक, एटीएस

Comments are closed.