नांदगाव: सचिन बैरागी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अश्लील, अपमानास्पद, वैयक्तिक स्वरुपाची आणि सामाजिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष संजय सानप यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी या वक्तव्याच्या विरोधात संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात मोर्चा काढत खा. राऊत यांच्याविरोधात 356/1, 351/4 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी भाजपा नांदगाव मंडल तालुका अध्यक्ष संजय सानप, रेखा शेलार, सतीश शिंदे, बाबाजी शिरसाठ, ताराबाई शर्मा, धनराज मंडलिक, बळवंत शिंदे, दिनेश जेजुरकर, कृष्णा देहाडराय, गणेश शर्मा, नितीनराव आंदोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————-
काय वक्तव्य होते राऊत यांचे ?
@ भारतीय जनता पार्टी ही एक रेव्ह पार्टी आहे. गिरीश महाजन नावाचा सांड हा मोकाट सुटलेला आहे. याला जर आवरले नाही तर एक दिवस देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही.
Comments are closed.