NGN News
Latest Marathi News

स्वच्छता अभियानानिमित्त घोटी बसस्थानकाची पाहणी, उपयुक्त सूचना 

घोटी : राहुल सुराणा

राज्य परिवहन महामंडळाच्या स्वच्छता अभियान निमित्त घोटी बस स्थानक येथे ‘रापम’च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच स्वच्छतेच्या निकषावरती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. 

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान निमित्त पालघर विभागाचे विभाग नियंत्रक कैलास पाटील तसेच गायकवाड यांनी घोटी बस स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नियंत्रक कक्ष ,पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी बस स्थानकाचा परिसर येथे पाहणी केली. त्यावेळी त्यांनी इगतपुरी आभार प्रमुख अहिरे तसेच कैलास नाठे, सानप, घोरपडे व वाहतूक नियंत्रक दीपक पारख यांना स्थानकात स्वच्छता नेहमी ठेवावी व स्वच्छतागृह कायम स्वच्छ ठेवावे असे उपयुक्त मार्गदर्शक पाटील यांनी केले. 

यावेळी परिसराची पाहणी करून सदर महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपयुक्त सूचना दिल्या. यावेळी इगतपुरी आगार प्रमुख कर्मचारी तसेच आगार चालक वाहक सफाई कामगार प्रवासी पत्रकार आदी उपस्थित होते. 

Comments are closed.