NGN News
Latest Marathi News

तिरुपती बालाजी येथे जनशांती धर्म सोहळ्याची उत्साहात सांगता

जगदगुरु शांतिगिरीजी महाराजांच्या दर्शनाला हजारो भाविकांची गर्दी

नाशिक : अमर आढाव

निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक तीर्थयात्रा निमित्त श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी येथे आयोजित जनशांती धर्म सोहळ्याची हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात सांगता झाली.

       जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यभूमी श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी येथील श्री ब्रम्हर्षी आश्रमात आठवडाभर ओम जगदगुरु जनशांती धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या सोहळ्या दरम्यान महाजपानुष्ठान,१०८ कुंडात्मक लक्ष्मी कुबेर महायज्ञ, अखंड नंदादीप, हस्त लिखित नामजप,श्रमदान यांसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.या भव्य दिव्य धर्म सोहळ्याची सांगता भक्तिपूर्ण वातावरणात झाली.सांगता सोहळ्याचा प्रारंभ पालखी मिरवणुकीने करण्यात आला.साधकांच्या मौनव्रताची सांगता श्रीफळ वाढवून करण्यात आली.आठवडाभर हवेवर अनुष्ठान करणाऱ्या साधकांच्या व्रताची सांगता स्वतः जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी तीर्थ देऊन केली.या धर्म सोहळ्यामध्ये देशभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने भक्ति आणि सदगुरु प्रेमाचे अनोखे दर्शन घडविले.रोज पहाटे, दुपारी व सायंकाळी नित्य नियम विधी, आरती, सत्संग, भजन, प्रवचन, भागवत वाचन, यांसह श्रमदान संपन्न झाले  भगवान तिरुपती बालाजीच्या वैकुंठमय दरबारात भक्त परिवाराच्या वतीने आठवडाभर सदगुरू नामाचा गजर अखंड सुरू होता. कार्यक्रमाची सांगता विशेष भक्तिभावाने पार पडली. कार्यक्रमात हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सेवा,भक्ती श्रमदान,समर्पण आणि भावनिक योगदानाने हा सोहळा अधिकच  संस्मरणीय ठरला. महायज्ञाचे पौरोहित्य पंडित विलासशास्त्री कुलकर्णी यांनी केले.धर्म सोहळा समितीचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले.जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या ३६ व्या पुण्यस्मरणाकडे जय बाबाजी भक्त परिवाराची वाटचाल सुरू झाली असून “उठा कामाला लागा”..हा दिव्य संदेश यावेळी देण्यात आला.

Comments are closed.