NGN News
Latest Marathi News

सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राणेनगर येथे स्थापना दिवस उत्साहात

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : सेंट फ्रान्सिस हायस्कूलचे संस्थापक ऑगस्टिन पिंटो यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेचा स्थापना दिवस आज दिनांक २७/८ /२०२६ रोजी साजरा करण्यात आला.

या दिवशी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विशेष सभेची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने, बायबल मधील वचन पठनानी झाली .प्रार्थना गीते, शिक्षणावर आधारित नाटिका, जन्मदिन गीते इत्यादी कार्यक्रमांचा सहभाग होता तसेच श्रेया बेलसरे, आरोही वाघ शर्वरी खैरनार या विद्यार्थी नी भरतनाट्यम व कत्थक नृत्याचे सादरीकरण केले.पिंटो सर यांच्या वाढदिवसानिमित्त सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वर येथील गारडा बालसंदन तसेच नववीच्या विद्यार्थ्यांनी नाशिक येथील पाथर्डी फाटा येथील मानव सेवा वृध्दाश्रमाला भेट दिली व जीवनोपयोगी वस्तू भेट दिल्या.

दिनाचे औचित्य साधून इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ज्युपिटर हाऊसने अजिंक्य पद पटकवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील मिस, विभाग प्रमुख शितल चिंचोलीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.