- शाखा को-चेअरमन दिपाली चांडक, सुरेश चावला तर जिल्हा समन्वयकपदी भावेश मानेक
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या नाशिक शाखेच्या चेअरमनपदी सचिन शाह यांची नियुक्ती करण्यात आली. शाखा को-चेअरमनपदी सौ. दिपाली चांडक व सुरेश चावला, तर जिल्हा समन्वयकपदी भावेश मानेक यांची नियुक्ती झाली. मुंबई येथे २९ सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत अध्यक्ष रविंद्र माणगावे, आयपीपी संतोष मंडलेचा व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
कार्यकारिणी सभेत अध्यक्ष रविंद्र मानगावे यांनी आयपीपी संतोष मंडलेचा, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशीष पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्षा सुनिता फाल्गुने, महेंद्र अग्रवाल राज्य मुख्य समन्वयक वेदांशू पाटील व इतर विभागांचे उपाध्यक्ष, कार्यकारणी सदस्यांच्या उपस्थितीत सचिन शाह, दिपाली चांडक, सुरेश चावला, भावेश मानेक यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, कृषी आणि फलोत्पादन समितीच्या चेअरमन राजाराम सांगळे, एफएमसीजी समिती चेअरमन प्रफुल्ल संचेती, दृष्टी, धोरण व माध्यम समिती चेअरमन शिवाजी मानकर, मासिया बिझनेस नेटवर्किंग फोरम समिती चेअरमन दत्ता भालेराव, खाण खनिजे व अग्रिगेटस समिती चेअरमन राहुल देशमुख, बंदरे, लॉजिस्टिक व वेअर हाऊसिंग समिती चेअरमन सी. एस. सिंग, अन्न प्रक्रिया, दूध आणि दुग्ध व्यवसाय उद्योग समिती को-चेअरमन वासुदेव भगत, वित्त समिती को-चेअरमन महेंद्र बच्छाव, युवा उद्योजक समिती को-चेअरमन कल्पेश लोया, सदस्यत्व समन्वय समिती को-चेअरमन अंजु सिंघल, शासकीय विभाग समन्वय समितीको-चेअरमन अजय आहुजा यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी सर्वानी शुभेछा दिल्या.
—
@ महाराष्ट्र चेंबरच्या नाशिक विभागीय कार्यालयाची चेअरमनपदाची मिळालेली ही जबाबदारी माझ्यासाठी निश्चितच आनंदाची आणि तितकीच जबाबदारीची आहे. माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्या संपूर्ण टीम च्या सभासदांना सोबत घेऊन सार्थ करून नक्कीच दाखवेन. हे वर्ष संस्थेचे 100 वर्ष पूर्णतःचे आहे बऱ्याच वेगवेगळ्या कल्पना आहेत त्या सत्यात उतरवण्याची ग्वाही देतो. आजच्या AI च्या युगात बदलत्या काळाची आव्हाने समजून घेत, नवीन ज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या उद्योजक,शेतकरी व व्यावसायिक बांधवांना त्याचा उपयोग करून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेन.
सचिन शाह, शाखा को-चेअरमन
Comments are closed.