NGN News
Latest Marathi News

सौंदर्याबरोबरच मनातला आनंदही महत्त्वाचा: पूजा गायकवाड

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : सौंदर्य खुलवताना मनातला आनंदही महत्त्वाचा असून मेहनत प्रामाणिकपणा आणि प्रेम या तीन गोष्टींवर रिवांशी मेक ओव्हर अँड ब्रायडल स्टुडिओच्या ऊदघाटन दिनाप्रसंगी मेकअप आर्टिस्ट पूजा गायकवाड यांनी प्रतिपादन केले.

त्यापुढे म्हणालल्या की सौंदर्य हे केवळ बाह्य रूप नाही आत्मविश्वास आनंद आणि प्रेम हे त्याचे प्रतीक आहे. एखाद्या नववधूच्या चेहऱ्यावर लग्नाच्या दिवशी उमटणारे आनंदाचे भाव हे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. सौंदर्य हे चेहऱ्यावरचा असतंच परंतु ते मनातून आनंदाने खुलवते. त्यासाठी चेहऱ्यावर नेहमी आनंद ठेवणे जीवनात महत्त्वाचे आहे.

बडदे नगर येथील नाना नारळी गार्डन समोर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी पूजा गायकवाड बोलत होत्या. यावेळी बडदे नगर परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

Comments are closed.