
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ करण्याची घोषणा केली. त्यानुसार, पेट्रोल ३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ३.११ रुपये प्रति लीटर इतके महागले आहे. एप्रिल २०२२ नंतर इंधन दरात पहिल्यांदाच वाढ करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचा सल्ला दिल्यानंतर तमाम देशवासियांना इंधन दरात वाढ होण्याची अटकळ बांधली जात होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) वाढत्या किमतींचा परिणाम लवकरच देशांतर्गत ग्राहकांवर होईल, अशी चर्चा सुरू होती. त्यानुसार, पेट्रोलियम कंपन्यांनी उपरोक्त घोषणा केली. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.
नाशिकमधील इंधनाचे नवे दर असे :
पेट्रोल– १०७.९३ रुपये
डिझेल– ९४.४१ रुपये
Comments are closed.