NGN News
Latest Marathi News

फ्रँकलिन टेम्पलटन फंडातर्फे ‘चेंज द सोच-कन्याकुमारी ते काश्मीर ड्राइव्ह’ मोहीम 

  • गुंतवणुक जागरूकतेसाठी देशभरातील गुंतवणूकदारांकरिता खासअभियानाला प्रारंभ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

फ्रँकलिन टेम्पलटन (इंडिया) ने ‘चेंज द सोच – कन्याकुमारी टू काश्मीर ड्राइव्ह’ या आपल्या देशव्यापी मोहिमेला आज हिरवा झेंडा दाखवला. सर्वसामान्यांमध्ये विशेषतः महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरु करण्यात आलेले हे अशा प्रकारचे पहिले अभियान आहे. भारतात फ्रँकलिन टेम्पलटनच्या वाटचालीला  ३० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ही ३० दिवसांची मोहिम देशाचे दक्षिण टोक असलेल्या कन्याकुमारीपासून सुरू होईल आणि देशातील २१ शहरांमधून प्रवास करत जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये तिची सांगता होईल. उपस्थितांशी संवाद साधणारी आर्थिक शिक्षण सत्रे, तज्ञांचे मार्गदर्शन आणि सामुदायिक सहभाग या आधारे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे रहस्य दूर करणे, त्याचबरोबर आपल्या आर्थिक भविष्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी हजारो भारतीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

देशभरात आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणाऱ्या या मोहिमेचे नेतृत्व फ्रँकलिन टेम्पलटन इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर हे करणार आहेत. या मोहिमेदरम्यान ते दर दोन दिवसाला विविध शहरांतील किंवा गावातील महिला गटांबरोबर गुंतवणूकदार शिक्षण कार्यशाळेतून संवाद साधणार आहेत. या कार्यशाळेत जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बचत, गुंतवणूक आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचे महत्त्व हे मुद्दे या महिला गटांसमोर स्पष्ट केले जाणार आहेत. या उपक्रमात विविध क्षेत्रातील घटकांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. विशेषतः विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहणार आहे. यामध्ये शेतकरी (मासेमारी समुदाय ते पीकांच्या लागवडीमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिला), शैक्षणिक क्षेत्र (विद्यार्थीनी, माता, शाळा आणि विद्यापीठातील शिक्षिका), बचत गट (अन्न आणि हातमाग क्षेत्रात कार्यरत महिला), उद्योजक, खासगी आणि सरकारी क्षेत्रातील महिला कर्मचारी त्याचबरोबर सैन्य, नौदल आणि पोलिस कर्मचारी या क्षेत्रातील महिलांचा समावेश राहणार आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना फ्रँकलिन टेम्पलटन-इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर म्हणाले, “भारताच्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता हा अतिशय मूलभूत आणि महत्वाचा घटक राहणार आहे. शहरांनी आर्थिक साक्षरेतबाबत प्रगती साध्य केली असली तरीही भारतातील टियर टू आणि टियर थ्री  प्रदेशांमधील लाखो महिला आर्थिक ज्ञान आणि वित्तीय पर्यायांच्या उपलब्धतेबाबत  आजही वंचित आहेत. या उपक्रमाद्वारे आम्ही विविध क्षेत्रातील महिलांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांना बचत, गुंतवणूक आणि डिजिटल वित्तीय पर्याय स्वीकारण्यासाठी ज्ञान प्रदान करताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत अधिक सक्षम करणार आहोत.”

ते पुढे म्हणाले, “जेव्हा महिला परिपूर्ण आर्थिक निर्णय घेतात, तेव्हा त्यांचे कुटूंब अधिक लवचिक बनू शकते. यातून समुदायांची भरभराट होऊ शकते आणि देश समावेशक विकासाच्या अधिक जवळ जाऊ शकतो. ही दरी भरून काढणे हे शिक्षणापेक्षाही अधिक महत्वाचे आहे. खासकरुन २०४७ पर्यंत विकसित भारत (विकसित राष्ट्राचा दर्जा) साकारण्याचा आणि अधिक समावेशक तसेच शाश्वत आर्थिक परिसंस्था निर्माण करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.”

Comments are closed.