
- सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला; गुन्हे शाखेची कारवाई
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहराच्या गंगापूर रोडवरील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात त्यांचे पती आणि जिल्हा रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांना याप्रकरणात पोलिसांनी अटक केली. अटक टाळण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली होती. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. नीलेश जेजूरकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे निर्देश दिले. तथापि. ते शरण न आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुंबई नाका-द्वारका परिसरातून गुन्हे शाखेने ही कारवाई केली. डॉ. मनीषा यांच्या मृत्यूचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. घटनेपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाला होता का? घटनेवेळी घरात नेमके कोण होतं? मृत्यूची परिस्थिती काय होती, याची चौकशी करण्यात येत आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर डॉ. नीलेश जेजूरकर यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Comments are closed.