** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : मूळ नागपुर येथील रहिवासी तथा कॉटन किंग प्रकाश कन्हैयालालजी माहेश्वरी (८६) यांचे निधन झाले. काही वर्षा पूर्वी ते नाशिक येथे आपल्या मुलाकडे राहण्यास आले होते. नाशिक येथील शिवम कलेक्शन चे मालक मनोज माहेश्वरी यांचे ते वडील आणि ग्राफाईट इंडिया लिमिटेडचे सी एमडी के के बांगर याचे ते सासरे होत.
त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माहेश्वरी यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रातील शुक्रतारा निखळला आहे, अशी भावना महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Comments are closed.