NGN News
Latest Marathi News

एशियन पेंट्स डॅम्प प्रूफ: काळाच्या कसोटीवर अबाधित राहणारा वॉटरप्रूफिंग चा महाविजेता

  • रणबीर कपूर आणि सौरभ शुक्ला यांची प्रमुख भूमिका असलेली नवीन मोहीम घरमालकांसाठीच एक साधे सत्य अधिक दृढ करते — “साधेसुधे वॉटरप्रूफिंग नाही, एशियन पेंट्स डॅम्प प्रूफ वापरा”

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक :भारतीय घरांना दरवर्षी दोन कठीण ऋतूंचा सामना करावा लागतो—मुसळधार पाऊस आणि उन्हाळ्यातील लाही लाही करणारी उष्णता. तरीही, अनेक घरमालक आपल्या गच्च्या आणि छतांचे संरक्षण करण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर आणि अविश्वसनीय वॉटरप्रूफिंग उपायांवर अवलंबून राहतात. त्यांच्या या अगदी अलिकडील मोहिमेद्वारे, ‘एशियन पेंट्स डॅम्प प्रूफ’ एका महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करते: सर्वच वॉटरप्रूफिंग सारखे नसते.गेल्या 13 वर्षाहून अधिक काळ, एशियन पेंट्स डॅम्प प्रूफ’ घरमालकांना त्यांच्या घरांत पाणी झिरपणे आणि तीव्र हवामानापासून संरक्षण करण्यास मदत करत आहे. हे द्रावण पाण्याचा भिंतींमध्ये शिरकाव होण्यापासून रोखणारा एक जाड, जलरोधक थर तयार करते आणि भारतातील तीव्र हवामानापासून दीर्घकाळ टिकणारे संरक्षण पुरवते.

रणबीर कपूर आणि सौरभ शुक्ला यांची प्रमुख भूमिका असलेला या ब्रँडचा अगदी अलिकडचा चित्रपट, विनोद, मिश्किल चेष्टामस्करी आणि खेळीमेळीच्या संवादांनी ओसंडणारी एक अत्यंत जिवंत कथा सांगतो. घरमालकांच्या दैनंदिन चिंतांमध्ये रुजलेला हा चित्रपट, पावसाळ्यात छतांची गळती ते उघड्या छतामुळे होणारा उकाडा अशा सामान्य समस्यांना टिपतो आणि त्यांचे एका चित्तवेधक व मनोरंजक संभाषणात रूपांतर करतो.

विनोद आणि चैतन्यशील संवादांद्वारे ही मोहीम आपला संदेश अत्यंत बेचूक पोहोचवते:“साधेसुधे वॉटरप्रूफिंग नाही, एशियन पेंट्स डॅम्प प्रूफ वापरा” (ऐसी वैसी वॉटरप्रुफिंग नही, एशियन पेंट्स डॅम्प प्रुफ लगाओ)

केवळ गच्चीवरील गळती रोखणेच नाही तर एशियन पेंट्स डॅम्प प्रूफ मध्ये प्रगत उष्णता-परावर्ती कोटिंगचाही समावेश आहे; ज्यामुळे पृष्ठभागाचे तापमान 10 डिग्री सेल्सियस नेकमी होते आणि पराकोटीच्या उन्हाळ्यातही घरे थंड राहतात.

या मोहिमेद्वारे, एशियन पेंट्स देशभरातील घरमालकांचा विश्वासपात्र, वॉटरप्रूफिंगसाठी खरा उपाय म्हणून डॅम्प प्रूफला महत्त्वाचे स्थान देत विश्वासार्ह संरक्षण देण्याचे त्यांचे दीर्घकालीन वचन पुन्हा देतात. कारण, तुमच्या घराच्या संरक्षणाचा प्रश्न येतो, तेव्हा “प्रत्येक वॉटरप्रूफिंग एशियन पेंट्स डॅम्प प्रुफ नसते” (” हर वॉटरप्रुफिंग एशियन पेंट्स डॅम्प प्रुफ नही होती”)

एशियन पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी अँड सीईओ), अमित सिंगल म्हणाले, “भारतीय घरांना मुसळधार पाऊस ते अतिशय कडक उन्हाळा अशा तीव्र हवामानांना तोंड द्यावे लागते; आणि घराचा सर्वात जास्त खुला भाग हा अनेकदा गच्चीच असतो.” एशियन पेंट्स डॅम्प प्रुफ अत्यंत विश्वासार्ह आणि दीर्घकाळ टिकणारे वॉटरप्रूफिंग देते; हे केवळ गळतीच रोखत नाही तर, उष्णता कमी करण्यासही मदत करते. याचे प्रगत उष्णता-परावर्ती कोटिंग पृष्ठभागाचे तापमान सुमारे 10डिग्री सेल्सियस ने कमी करते आणि हे 10 वर्षे वॉटरप्रुफ राहण्याची हमी देते; ज्यामुळे घरे वर्षभर संरक्षित आणि आरामदायी राहण्यास मदत मिळते. ही मोहीम हे प्रमुख लाभ आकर्षक पद्धतीने सादर करते. भारतातील ‘कव्वाली’ या लोकप्रिय कथाकथन प्रकाराचा वापर करून, आम्ही तांत्रिक श्रेणीचे एका रंजक संभाषणात रूपांतर केले आहे; ज्यामुळे ग्राहकांना सामान्य वॉटरप्रूफिंग आणि ‘एशियन पेंट्स डॅम्प प्रूफ वॉटरप्रूफिंग’ यांमधील फरक सहजपणे समजण्यास मदत झाली आहे.

रणबीर कपूर यांना संभाषणात अग्रस्थानी ठेवत, आम्ही एक महत्त्वाचा संदेश अधोरेखित करत आहोत: “प्रत्येक वॉटरप्रूफिंग एशियन पेंट्स डॅम्प प्रुफ नसते” (” हर वॉटरप्रुफिंग एशियन पेंट्स डॅम्प प्रुफ नही होती”) – एशियन पेंट्स डॅम्प प्रुफ हाच वॉटरप्रूफिंगचा खरा महाविजेता आहे; जो भारतीय घरांसाठी विश्वासार्ह कामगिरी आणि राहण्याचा अधिक सुखद अनुभव देतो.ही मोहीम टेलिव्हिजन, डिजिटल, ओटीटी, समाज माध्यम प्लॅटफॉर्म्स आणि चित्रपटगृहांच्या पडद्यांवर चालवली जाईल; तसेच क्रिकेट सामन्यांदरम्यान ती विशेषत: ठळकपणे दाखवली जाईल. 

Comments are closed.