· एकूण जमा निधीच्या 60% पर्यंतची रक्कम करमुक्त वारसा (लेगसी) म्हणून मागे सोडा
· आंशिक पैसे काढण्याची (पार्शिअल विड्रॉवल) तरतूद
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
बाजारपेठेशी संबंधित परताव्याद्वारे संपत्ती निर्माण करण्यासाठी ‘आयसीआयसीआय लाईफ सिग्नेचर पेन्शन’ व्यक्तींना मदत करते, तसेच यात करमुक्त वारसा नियोजनाचा पर्यायही उपलब्ध आहे. वयाची 90 वर्षांपर्यंतची ‘वेस्टिंग एज’ (पेन्शन सुरू होण्याचे वय) असल्याने, 40 व्या वर्षीही ही योजना सुरू करणे शक्य आहे. तसेच दीर्घकाळ गुंतवणूक कायम ठेवून ‘कंपाउंडिंग’च्या (चक्रवाढ व्याजाच्या) सुविधेचा लाभ घेता येतो.
या उत्पादनाबद्दल भाष्य करताना, आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्सचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर, श्री. विकास गुप्ता म्हणाले, “निवृत्ती नियोजन आणि वारसा नियोजन हे एकमेकांशी संबंधित आहेत. मात्र, अशा प्रकारच्या आर्थिक योजना गुंतागुंतीच्या असू शकतात आणि त्यात करविषयक बाबींचाही समावेश असू शकतो. ‘आयसीआयसीआय लाईफ सिग्नेचर पेन्शन’ या दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हे उत्पादन ग्राहकांना विविध फंड पर्यायांच्या माध्यमातून बाजारपेठेशी संबंधित निधी उभारण्यास मदत करते. योजना पूर्ण झाल्यावर (वेस्टिंगच्या वेळी), एकूण निधीपैकी ६०% पर्यंतची रक्कम करमुक्त म्हणून काढता येते, जी पुढील पिढीला वारसा म्हणून दिली जाऊ शकते. उर्वरित रकमेतून ‘ऍन्युइटी’ उत्पादन खरेदी करता येते, ज्याद्वारे निवृत्तीनंतर आयुष्यभर खात्रीशीर उत्पन्न मिळू शकते.”दीर्घकालीन संपत्ती निर्मिती आणि बाजारपेठेवर आधारित परतावा यांचा सुरेख मेळ साधणारी ही योजना, ग्राहकांसाठी आणि त्यांच्या प्रियजनांसाठी निवृत्ती तसेच वारसा नियोजनाचा एक भक्कम आधार प्रदान करते.
‘आयसीआयसीआय लाइफ सिग्नेचर पेन्शन’ योजनेमध्ये ग्राहकांसाठी ‘डेथ बेनिफिट’ (मृत्यू लाभ) उपलब्ध आहे. यामध्ये भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105% रक्कम किंवा ‘फंड व्हॅल्यू’ (निधीचे मूल्य) यांपैकी जी रक्कम जास्त असेल, ती दिली जाते. त्यामुळे, पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला (नॉमिनी) हा मृत्यू लाभ मिळतो. जर पॉलिसी ‘जॉइंट लाइफ’ तत्त्वावर घेतली असेल, तर मुख्य विमाधारकाचा मृत्यू झाल्यास प्रीमियम भरण्यापासून सवलत (वेव्हर ऑफ प्रीमियम) मिळते आणि दुसऱ्या विमा धारकांसाठी पॉलिसी सुरू राहते. अशा परिस्थितीत, दुसऱ्या विमाधारकाचा मृत्यू झाल्यावर नामनिर्देशित व्यक्तीला मृत्यू लाभाची रक्कम दिली जाते.
थोडक्यात सांगायचे तर, या पॉलिसीद्वारे मिळणारी रक्कम वारसा म्हणून दिली जाऊ शकते. ही योजना ग्राहकांना इक्विटी मार्केटमध्ये 100% पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी देते, ज्यामध्ये फंडचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यात प्रीमियम भरण्याचे आणि पॉलिसीच्या कालावधीचे अनेक पर्याय आहेत; पॉलिसीचा कालावधी वयाच्या 90 वर्षांपर्यंत असू शकतो, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांचे नियोजन करणे सोपे जाते. ग्राहक एकापेक्षा जास्त व्यक्तींना नामनिर्देशित (नॉमिनी) करू शकतात आणि प्रत्येकाला पॉलिसीच्या लाभातील किती हिस्सा मिळेल, हे देखील निश्चित करू शकतात. यामुळे वारसाहक्काचे वाटप अधिक सुव्यवस्थित होते.
ज्यांना आपल्या प्रियजनांसाठी एक भक्कम आर्थिक पाया तयार करायचा आहे आणि त्याच वेळी, नामनिर्देशित व्यक्तींना पॉलिसीचे लाभ मिळतील याची खात्री करायची आहे, अशा व्यक्तींसाठी हे उत्पादन उपयुक्त आहे.
Comments are closed.