- बँकेचा ३२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीचा बहर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
श्री समर्थ सहकारी बँक लिमिटेड, नाशिकचा ३२ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीसत्यनारायण पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास बँकेचे चेअरमन, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, सभासद, ग्राहक, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी बँकेच्या आजवरच्या ३२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला. यावेळी चेअरमन श्री. मनोज बाग यांनी नमूद केले की, बँकेने आपल्या स्थापनेपासून ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त आणि सहकाराच्या मूल्यांची जपणूक करत प्रगतीची वाटचाल सुरू ठेवली आहे. बदलत्या बँकिंग क्षेत्रातील आव्हानांचा स्वीकार करून आधुनिक तंत्रज्ञान, ग्राहकाभिमुख सेवा आणि विविध बँकिंग सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याचा बँकेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. सर्व ग्राहक, सभासद, खातेदार यांचे वेळोवेळी सहकार्य असल्याने त्यांचे आभार मानले.
बँकेच्या ३२ व्या वर्धापनदिनाचे निमित्ताने आमदार राहुल ढिकले, भाजप नेते लक्ष्मण सावजी, माजी महापौर रंजना भानसी, नगरसेवक बबलू शेलार, नगरसेविका सीमा पवार, संध्या कुलकर्णी, माजी नगरसेवक अरुण पवार, नामको बँकेचे अध्यक्ष विजय साने, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक व सर्व सदस्य, बीबीएनचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी व सर्व सदस्य, पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक चंद्रशेखर पंचाक्षरी, भाजप नेते गोपाळ पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष राजू व्यास, सावानाचे कार्यकारी सदस्य देवदत्त जोशी, मंगेश खाडीलकर, जनकल्याण बँकेचे चेअरमन नानासाहेब सोनवणे, प्रमोद पुराणिक, विनायक रानडे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री शरद जाधव व सहकार भारतीचे नाशिक ग्रामीणचे महामंत्री शंतनू पाटील, म्हाडाचे अध्यक्ष व नामको बँकेचे संचालक रंजन ठाकरे, सॅटरडे क्लबचे सदस्य योगेश सोनजे. प्रवीण केंगे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य मिथीला कापडणीस, निलिमा पाटील व सदस्य, नामको बँकेचे सीईओ त्रिगुण कुलकर्णी, जनलक्ष्मी बँकेचे सीईओ भूषण रानडे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शंतनू देशपांडे, मयूर कपाटे, स्त्री उद्यमी फाऊंडशनचे सदस्य, रामदास नागवंशी, वसंत कुलकर्णी, सचिन दप्तरी, प्रवीण कुलकर्णी, चंद्रशेखर तारे, नातू, बळिराम चांडोळे, सदाशिव राजेबहाद्दर, सुहास भणगे, जनस्थान पतसंस्थेचे सुनील खोडके, तसेच बँकेचे माजी संचालक बाळकृष्ण कुलकर्णी, अरुण भांड, सी.ए. मिलिंद कुलकर्णी, मकरंद सुखात्मे, डॉ. प्रशांत पुरंदरे, मंगेश मालपाठक, नरेंद्र कुलकर्णी, डॉ. रविकिरण निकम, ज्येष्ठ संपादक मिलिद सजगुरे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र जोशी, श्रीपाद कुलकर्णी, मनोज गोडसे उपस्थित होते.
बँकेचे संचालक राजेश गांगुर्डे , मंदार ओलतीकर, पुष्कर पाराशरे, मंदार तगारे , राजेंद्र खेडलेकर, दीप्ती पंडित, योगिता खांडेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश चितोडकर यांनी मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी सर्व कर्मचारी वृंद तसेच बँकेचे मान्यवर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी चेअरमन श्री. मनोज बाग यांनी, बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणारे सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष आभार व्यक्त केले. भविष्यातही ग्राहकांचा विश्वास संपादन करून बँकेला प्रगतीच्या अधिक उंच शिखरावर नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
बँकेचा वर्धापनदिन कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments are closed.