** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : साप्ताहिक न्यूज मसाला च्या ‘लोकराजा’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. वाचनीय आणि संग्राह्य स्वरूपातील या विशेषांकातील दर्जेदार मजकुराची सर्वांनी प्रशंसा केली.
साईबाबा हॉस्पिटलच्या सभागृहात हा छोटेखानी सोहळा पार पडला. याप्रसंगी साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) दीपक पाटील, जि. प. कर्मचारी सह. बँकेच्या व्यवस्थापकीय सदस्या मंदाकिनी पवार, व्यवस्थापकीय सदस्य प्रमोद निरगुडे, वैशाली प्रकाशन, पुणे चे संचालक विलास पोतदार यांच्यासह संपादक नरेंद्र पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. अतिथींनी आपापल्या भाषणात साप्ताहिक न्यूज मसाला च्या सातत्यपूर्ण दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्याच्या परंपरेचा गौरव केला. वाचन संस्कृती जतन करण्याच्या संपादक नरेंद्र पाटील यांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांचे देखील सर्वांनी कौतुक केले. प्रास्ताविकात नरेंद्र पाटील यांनी आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले यांनी सुत्राचालन केले.
‘लोकराजा’ दिवाळी विशेषांक प्रकाशन प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद चिंधडे, सुभाष सबनीस, इंजि.वाळू आहेर, अण्णासाहेब बडाख, दिलीप साळुंके, ज्येष्ठ पत्रकार सतीश डोंगरे, अजय भोसले आणि जीजा दवंडे, लेखिका ज्योत्स्ना पाटील, प्रा. बाळासाहेब सोनवणे, सुनील देसले, तेजस पाटील, जिग्नेश पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed.