
- ग्राहकांना व्हॅल्यू-प्लस-मोमेंटम गुंतवणूक धोरण उपलब्ध करून देणार
- बीएसई 500च्या विस्तृत श्रेणीतून निवडलेल्या 50 कंपन्यांमध्ये, नियमांच्या आधारे गुंतवणूक पद्धतीद्वारे गुंतवणुकीची संधी.
- गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी आकर्षक मूल्यमापन आणि सकारात्मक प्राइस मोमेंटम यांचा मेळ घालते.
- बाजारातील बदलती मूल्यमापने आणि कल यांना पद्धतशीरपणे प्रतिसाद देण्यासाठी पोर्टफोलिओचे त्रैमासिक पुनरावलोकन केले जाते.
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
कंपनीने ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ बीएसई 500 मोमेंटम व्हॅल्यू 50 इंडेक्स फंड’ सादर केला आहे. हा एक व्हॅल्यू-प्लस-मोमेंटम गुंतवणूक पर्याय असून, तो ग्राहकांना निवडक युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्सद्वारे (युलिप्स) दीर्घकालीन इक्विटी संधी उपलब्ध करून देतो.या फंडाच्या शुभारंभावर भाष्य करताना, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी, श्री. मनीष कुमार म्हणाले, “ग्राहकांना एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक गुंतवणूक धोरण उपलब्ध करून देण्यासाठी बीएसई 500 मोमेंटम व्हॅल्यू 50 इंडेक्स फंड तयार करण्यात आला आहे, जे व्हॅल्यू आणि मोमेंटम या गुंतवणुकीच्या दोन महत्त्वाच्या घटकांना एकत्र आणते. आकर्षक व्हॅल्युएशनमुळे मूल्यांकनाबाबत दिलासा मिळू शकतो, तर सकारात्मक मोमेंटम बाजारातील वाढता आत्मविश्वास दर्शवतो. हे घटक एकत्र आणल्यामुळे, हे धोरण अशा कंपन्या ओळखू शकते ज्या या दोन्ही निकषांवर मजबूत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना व्हॅल्युएशनवर लक्ष केंद्रित करून उदयोन्मुख संधींमध्ये सहभागी होण्यास मदत होते.”
एका पद्धतशीर दृष्टिकोनावर हे धोरण आधारित आहे आणि तिचा दर तिमाहीला आढावा घेतला जातो; यामुळे बाजारातील बदलती मूल्यमापने आणि कल यानुसार पोर्टफोलिओमध्ये आवश्यक ते बदल करणे शक्य होते. आम्हाला विश्वास आहे की, या दृष्टिकोनामुळे ग्राहकांना गुंतवणुकीची शिस्त पाळून दीर्घकालीन इक्विटी वाढीचा लाभ घेण्याचा एक वेगळा मार्ग मिळू शकतो.
हा फंड ग्राहकांना बीएसई 500 मधील निवडक 50 कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण समूहामध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो आणि ‘आयसीआयसीआय प्रु बीएसई 500 मोमेंटम व्हॅल्यू 50 कस्टमाइझ्ड इंडेक्सचे अनुसरण करतो. नियामक मार्गदर्शक तत्त्वांमुळे एखादा शेअर निवडणे शक्य न झाल्यास, 50 शेअर्सचा समूह कायम ठेवण्यासाठी त्यानंतरच्या पात्र शेअरची (किंवा शेअर्सची) निवड केली जाते. याच्या नियमांवर आधारित कार्यपद्धतीमुळे, बाजारातील मूल्यमापने आणि कल बदलत असताना पोर्टफोलिओमध्ये वेळोवेळी आवश्यक ते बदल करणे शक्य होते, ज्यामुळे ग्राहकांना गुंतवणुकीची एक पारदर्शक आणि पद्धतशीर चौकट उपलब्ध होते.
शिवाय, आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो 99.3% इतके होते आणि विशेष चौकशीची गरज नसलेल्या वैयक्तिक दाव्यांसाठी लागणारा सरासरी कालावधी केवळ 1 दिवस होता; हे सर्व कंपनीची आपल्या ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलेले वचन पूर्ण करण्याबाबतची वचनबद्धता दर्शवते. 30 जून 2026 रोजी कंपनीची अॅसेट अंडर मॅनेजमेंट (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) 3.34 लाख कोटी रुपये इतकी होती आणि स्थापनेपासून कंपनीकडे कोणतीही ‘नॉन-परफॉर्मिंग ॲसेट‘ (एनपीए) नाही, जे कंपनीच्या मालमत्ता पोर्टफोलिओचा उच्च दर्जा दर्शवते.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ बीएसई 500 मोमेंटम व्हॅल्यू 50 इंडेक्स फंड हा लाईफ कव्हरसह, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफच्या आयसीआयसीआय प्रु स्मार्टकिड अॅश्युअर, आयसीआयसीआय प्रु सिग्नेचर अॅश्युअर, आयसीआयसीआय प्रु सिग्नेचर ऑनलाइन आणि आयसीआयसीआय प्रु स्मार्ट इन्शुरन्स प्लॅन प्लस यांसारख्या यूएलआयपी योजनांमार्फत www.iciciprulife.com येथे उपलब्ध होईल.
Comments are closed.