NGN News
Latest Marathi News

भारतीय फलोत्पादनाच्या भविष्याला चालना देणारे महिंद्रा ओज

  • आधुनिक शेतीसाठी खास तयार केलेली, महिंद्रा ओज ही श्रेणी फळबाग, द्राक्षबागा, आंतरमशागत आणि विशेष पिकांच्या वापरामध्ये उत्पादकता, सोय आणि किफायतशीरपणा वाढवण्यासाठी डिझाइन केली आहे.
  • सर्वमान्य म्हणून 4WD सह (फोर-व्हील ड्राइव्ह) उपलब्ध असलेले, ओज प्लॅटफॉर्म कार्यक्षमता आणि पीक उत्पादकता वाढवण्यासाठी सर्वोत्तम पॉवर-टू-वेट रेशो, प्रगत तंत्रज्ञान आणि अवजारांची सुसंगतता यांचा उत्तम मेळ घालते.

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

महिंद्रा ग्रुपचा भाग असलेल्या आणि भारतातील नं.1 ट्रॅक्टर ब्रँड असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर्सने आज ओज प्लॅटफॉर्मची तिसरी वर्षपूर्ती साजरी केली. या प्लॅटफॉर्ममुळे भारतातील महत्त्वाच्या शेती कामांमध्ये कॉम्पॅक्ट लाइटवेट 4डब्ल्यूडी (4WD) ट्रॅक्टर्सचा स्वीकार आणि विस्तार वेगाने झाला आहे.

मजबूत तंत्रज्ञानावर आधारित आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या लाइटवेट ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मचा आधार असलेली ओज कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर श्रेणी आता भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ट्रॅक्टर विभागांपैकी एक असलेल्या 21-30 एचपी (hp) श्रेणीमध्ये अनेक उत्पादनांचा समावेश करते – आणि ती खास करून उच्च- मूल्य शेती आणि विशेष शेती कामांसाठी विकसित केली गेली आहे.

द्राक्षबागा, फळबागा, ऊस आणि ओळीने लावलेल्या पिकांच्या लागवडीसाठी तयार केलेली, ओज ही श्रेणी कॉम्पॅक्ट आकारमान, अचूक हाताळणी, उत्कृष्ट गतिशीलता आणि सर्वोत्तम पॉवर-टू-वेट रेशो यांचा मिलाफ साधते, ज्यामुळे आधुनिक शेतीसाठी तो एक बहुपयोगी आणि कार्यक्षम उपाय ठरतो. स्टँडर्ड म्हणून 4WD सह, ओज रेंज विविध प्रकारच्या भूभागांवर उत्कृष्ट ट्रॅक्शन, स्थिरता आणि उत्पादकता देते, तसेच विविध प्रकारच्या शेती अवजारांशी सुसंगतता सुनिश्चित करते. अरुंद-ट्रॅक कॉन्फिगरेशनमुळे मर्यादित जागेत कार्यक्षमतेने काम करण्याची त्याची क्षमता आणखी वाढते.

एका मजबूत तीन-सिलेंडर इंजिनाच्या आधारे, ओज रेंज विविध प्रकारच्या कामांमध्ये दमदार कामगिरी, उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता आणि विश्वसनीय कार्यप्रणाली प्रदान करते.

PROJA टेक पॅक अंतर्गत इलेक्ट्रॉनिक पॉवर टेक-ऑफ (ePTO), इलेक्ट्रॉनिक ड्राफ्ट अँड डेप्थ कंट्रोल (EDDC), FR (फॉरवर्ड + रिव्हर्स) तसेच शटल आणि क्रीपर मोड्स यांसारखी उत्पादकता वाढवणारी वैशिष्ट्ये दिली आहेत, ज्यामुळे कार्यक्षमता, अचूकता आणि चालवण्यातील सुलभता सुधारते. चालकाच्या सोयीसाठी या क्षेत्रातील पहिलीच टिल्ट आणि टेलिस्कोपिक’ स्टिअरिंग, साइड-शिफ्ट कंट्रोल्स आणि अर्गोनॉमिक रचना (सुविधाजनक मांडणी) यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे कामाच्या दीर्घ तासांदरम्यान होणारा थकवा कमी होण्यास मदत होते.

याव्यतिरिक्त, महिंद्रा OJA ट्रॅक्टर श्रेणीमध्ये MYOJA टेक पॅकद्वारे टेलिमॅटिक्सची सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे, तर ROBOJA टेक पॅकद्वारे ऑटो PTO, ऑटो इम्प्लिमेंट लिफ्ट आणि ऑटो वन- साइड ब्रेकिंग यांसारखी ऐच्छिक ऑटोमेशन वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

महिंद्राच्या प्रगत इंजिन तंत्रज्ञानावर आधारित ओज श्रेणी उत्कृष्ट टॉर्क क्षमता, इंधनाची उत्तम बचत आणि विश्वसनीय कामगिरी प्रदान करते; ज्यामुळे शेतकऱ्यांना कष्टाची आणि आव्हानात्मक कामे आत्मविश्वासाने तसेच खात्रीशीरपणे करणे शक्य होते. तसेच, ही श्रेणी प्रति पीक-चक्र कमी परिचालन खर्च आणि ट्रॅक्टरच्या संपूर्ण कार्यकाळात देखभालीची कमी गरज यांसारखे फायदेही देते.

महिंद्रा ट्रॅक्टर्सचे सीईओ हर्ष राय म्हणाले, “शेतीचे भविष्य हे विशेषीकृत आणि तंत्रज्ञानावर आधारित अशा उपायांमध्ये दडलेले आहे, जे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादकता आणि नफा वाढवण्यास मदत करतात, यावर महिंद्राचा विश्वास आहे. भारतातील फलोत्पादन आणि विशेषीकृत शेतीचे क्षेत्र वेगाने विकसित होत असताना, विशिष्ट कामांसाठी तयार केलेल्या यांत्रिकीकरणाची गरज अधिकाधिक महत्त्वाची ठरते आहे.
गेल्या तीन वर्षांत, ओज प्लॅटफॉर्मने या दृष्टिकोनाला मूर्त रूप दिले आहे; आधुनिक शेती आणि विशेषीकृत शेतीची बदलती गरज पूर्ण करण्यासाठी यात जागतिक दर्जाची अभियांत्रिकी, नावीन्य आणि ग्राहकांच्या गरजांची सखोल समज यांचा संगम साधला गेला आहे. भारतातील आघाडीचा ट्रॅक्टर ब्रँड म्हणून, आम्ही ओजसारखी जागतिक दर्जाची आणि भविष्यातील गरजांसाठी सज्ज उत्पादने उपलब्ध करून देण्यावर लक्ष
केंद्रित करत आहोत, जी शेतकऱ्यांना प्रत्येक एकरातून अधिक उत्पादन घेण्यास सक्षम करतात.”

महिंद्रा ट्रॅक्टर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विपणन तसेच राष्ट्रीय व्यवसाय कामकाज प्रमुख, परीक्षित घोष म्हणाले, “ओजने फलोत्पादन, द्राक्षाच्या बागा, फळबागा, ऊस शेती आणि इतर विशेष प्रकारच्या शेतीमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांची पसंतीची निवड म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज हे ट्रॅक्टर अनेक मॉडेल्समध्ये उपलब्ध असून, यात प्रत्येक 3 ते 4 एचपी (HP) च्या टप्प्यावर विविध पर्याय दिले गेले आहेत. शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षमतेने आणि फायदेशीररीत्या शेती करण्यास मदत करतील अशा, विशिष्ट कामांसाठी उपयुक्त ठरणारे उपाय (ॲप्लिकेशन-स्पेसिफिक सोल्युशन्स) ओजच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे.”

ओजच्या माध्यमातून महिंद्रा प्रगत ट्रॅक्टर तंत्रज्ञान, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि बहुपयोगी उपाययोजना देत आहे. या उपाययोजना, यांत्रिकीकरणातील गुंतवणुकीतून अधिक उत्पादकता, कार्यक्षम परिचालन आणि अधिक मूल्य मिळवू पाहणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करतात.

हलक्या वजनाच्या 4WD ट्रॅक्टरच्या डिझाइन आणि अभियांत्रिकीमधील एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून, ओज जागतिक दर्जाचे नावीन्य, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता यांचा मिलाफ साधते, जे शेतकऱ्यांना शेतीमधील विशेष कामांमध्ये उत्पादकता सुधारण्यास मदत करते. या संपूर्ण श्रेणीला महिंद्राच्या उद्योगातील सर्वोत्तम सहा वर्षांच्या वॉरंटीचा आधार आहे.

भारतातील महिंद्रा रिसर्च व्हॅली आणि जपानमधील मित्सुबिशी महिंद्रा ॲग्रीकल्चरल मशिनरी येथील इंजिनीअर टीम्सने संयुक्तपणे विकसित केलेले, ओज प्लॅटफॉर्म भारतीय आणि जागतिक बाजारपेठांसाठी डिझाइन केलेले आहे आणि ते शेती तसेच बिगरशेती कामांसाठी 40 हून अधिक ट्रॅक्टर मॉडेल्सना सपोर्ट करते.

Comments are closed.