NGN News
Latest Marathi News

‘द अर्थशॉट प्राइझ’ साठी अंतिम स्पर्धकांमध्ये महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीची निवड

द अर्थशॉट प्राइझ 2026 साठी निवडल्या गेलेल्या जागतिक पातळीवरील 15 अंतिम स्पर्धकांमध्ये एकमेव कॉर्पोरेट संस्था आणि वाहन उत्पादक कंपनी
 पर्यावरणपूरक लास्ट-माइल मोबिलिटीचा विस्तार आणि उपजीविकेला आधार दिल्याबद्दल कौतुक; महिंद्राच्या 4 लाखांहून अधिक तीन-चाकी इलेक्ट्रिक वाहनांनी 9 अब्ज किलोमीटरहून अधिक अंतर कापले असून, यामुळे सुमारे 1,85,000 मेट्रिक टन CO2 उत्सर्जन टाळण्यास मदत झाली आहे.
 महामहिम प्रिन्स विल्यम यांनी सुरू केलेला द अर्थशॉट प्राइझ हा पुरस्कार दरवर्षी जागतिक स्तरावर अशा 15 उपाययोजनांची निवड करतो ज्यांच्यात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय प्रभाव निर्माण करण्याची क्षमता आहे.
 द अर्थशॉट प्राइझ पहिल्यांदाच भारतात येत असून, 17 नोव्हेंबर रोजी मुंबईत 2026 मधील परिषद आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे.

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

द अर्थशॉट प्राईज 2026 साठीच्या 15 जागतिक अंतिम स्पर्धकांमध्ये निवडण्यात आलेली महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेड (एमएलएमएमएल) ही एकमेव भारतीय ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. 2020 मध्ये महामहिम प्रिन्स विल्यम यांनी सुरू केलेला द अर्थशॉट प्राईज हा पुरस्कार, जगातील काही अत्यंत गंभीर पर्यावरणीय आव्हानांवरील पर्याय सुचवतो आणि त्यांना पाठिंबा देतो. इलेक्ट्रिक लास्ट-माईल वाहतुकीतील
कार्यासाठी एमएलएमएमएलची क्लीन अवर एअर या श्रेणीअंतर्गत निवड करण्यात आली आहे. अर्थशॉट्स अंतर्गत पाच श्रेणींमध्ये प्रत्येकी तीन अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक श्रेणीतील एका विजेत्याला 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात 1 दशलक्ष पाऊंड (£1 million) दिले जातील.

इलेक्ट्रिक लास्ट-माईल मोबिलिटीकडे होणारे संक्रमण हे उत्सर्जनापुरते मर्यादित नाही, तर ते उपजीविकेशीही संबंधित आहे. तीन चाकी वाहने आणि लहान व्यावसायिक वाहने ही संपूर्ण भारतातील चालक, दुकानदार, डिलिव्हरी पार्टनर आणि लहान व्यवसायांसाठी कार्यरत मालमत्ता आहेत. ऑपरेशनल खर्च कमी करून आणि चांगल्या कमाईच्या क्षमतेला पाठिंबा देऊन, इलेक्ट्रिक मोबिलिटीने सूक्ष्म-उद्योजकतेला बळकटी दिली आहे, यासोबतच वाहनांच्या एक्झॉस्ट पाईपमधून होणारे उत्सर्जन कमी करून शहरी हवेची गुणवत्ता सुधारली आहे. एमएलएमएमएलने 4 लाखांहून अधिक ईव्ही विकल्या असून, एकत्रितपणे त्यांनी 9 अब्ज किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे आणि अंदाजे 185,000 मेट्रिक टन CO2 उत्सर्जन टाळण्यास मदत केली आहे.

या स्थित्यंतराच्या अनुषंगाने एमएलएमएलने (MLMML) ग्राहक-सहाय्य उपक्रमही तयार केले आहेत, ज्यात त्यांच्या उदय नेक्स्ट (UDAY NXT) उपक्रमाचा समावेश आहे. चालक अपघाती विमा आणि आर्थिक सल्ला यांसारखे लाभ हा उपक्रम देतो, आणि या माध्यमातून वाहनापलीकडे जाऊन मालक-चालक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणावर आणि लवचिकतेवर लक्ष केंद्रित केले आहे.

राजेश जेजुरीकर, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी – ऑटो आणि फार्म सेक्टर, महिंद्रा अँड महिंद्रा लि. म्हणाले, “लास्ट-माईल मोबिलिटी मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम साधू शकते. आज रस्त्यावर धावणारी 4 लाखांहून अधिक महिंद्रा इलेक्ट्रिक वाहने दररोज 4 लाख लोकांच्या उपजीविकेला चालना देत आहेत. यापैकी अनेक ग्राहकांसाठी, ही वाहने वर्किंग ऍसेट्स आहेत, जी त्यांच्या कुटुंबांना आधार देतात आणि सूक्ष्म-उद्योजकतेला सक्षम करतात. द अर्थशॉट प्राइजसाठी अंतिम स्पर्धक म्हणून निवड होणे, ही अशा एका मॉडेलला मिळालेली मान्यता आहे जिथे स्वच्छ वाहतूक, ग्राहकांची समृद्धी आणि व्यापकता एकत्र येतात, आणि यामुळे आमचा हा विश्वास अधिक दृढ होतो की, भारतात सिद्ध झालेले उपाय इतर बाजारपेठांमध्येही उपयुक्त ठरू शकतात.”

महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, सुमन मिश्रा म्हणाल्या, “इलेक्ट्रिक मोबिलिटीचा प्रभाव अशा चालकांच्या आणि उद्योजकांच्या दैनंदिन जीवनात दिसून येतो, जे आपल्या उत्पन्नासाठी या वाहनांवर अवलंबून आहेत. जेव्हा ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहने हा अधिक फायदेशीर आर्थिक पर्याय ठरतो, तेव्हा स्वच्छ वाहतूक व्यवस्थेचा (क्लीनर मोबिलिटी) विस्तार अधिक वेगाने होऊ शकतो. उपजीविकेवर होणारा सकारात्मक परिणाम आणि पर्यावरणाला होणारा लाभ यांचा हा संगम आम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसून
येत आहे. अर्थशॉट प्राईजद्वारे मिळालेली ही मान्यता आम्हाला हे मॉडेल भारतात आणि त्यापलीकडेही अधिक व्यापक स्तरावर नेण्यासाठी प्रोत्साहित करते.”

भारतातील तीन-चाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे होणाऱ्या मोठ्या संक्रमणाने आंतरराष्ट्रीय स्तराचेही लक्ष वेधून घेतले आहे. द संडे टाइम्सने (यूके) अंतिम स्पर्धकांची घोषणा होण्यापूर्वी लखनौमधून दिलेल्या वृत्तामध्ये, इलेक्ट्रिक रिक्षांमुळे चालकांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित आर्थिक बाबी कशा बदलत आहेत आणि त्याच वेळी स्थानिक पातळीवरील उत्सर्जन कसे कमी होत आहे, याचे वर्णन केले आहे. या अहवालात अशा चालकांच्या अनुभवांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे होणाऱ्या बचतीचा थेट फायदा त्यांच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ होण्यास आणि मालमत्ता निर्मितीस झाला आहे.

महामहिम प्रिन्स विल्यम यांनी महिंद्राच्या कार्याचे वर्णन “आधीच मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित असलेला आणि शहरांमधील लोकांच्या प्रवासाची पद्धत बदलणारा एक व्यावहारिक उपाय” अशा शब्दात केले आहे. महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी हा जगभरातील 15 अंतिम स्पर्धकांच्या वैविध्यपूर्ण 2026 गटाचा एक भाग आहे. इतर अंतिम स्पर्धकांमध्ये ऑर्स्टेड, महिला हाऊसिंग ट्रस्ट, एअर क्यूओ, सॅटेलाईट ऑन फायर, पुला, सिटी ऑफ बार्सिलोना, भूतान, इंडिजिनियस डेझर्ट अलायन्स, येल्लोस्टोन टू युकॉन कन्झर्व्हेशन इनिशिएटिव्ह, झीरो एमिशन मेरीटाईम बायर्स अलायन्स (ZEMBA), न्यूई ओशन वाईड ट्रस्ट, पीएफएएस-फ्री फ्रान्स, साऊथ कोरिया झीरो वेस्ट मुव्हमेंट नेटवर्क आणि मदर अर्थ फाउंडेशन यांचा समावेश आहे.

पाच विजेत्यांची घोषणा 17 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईत होणाऱ्या द अर्थशॉट प्राइज अवॉर्ड्स नाईट या कार्यक्रमात
केली जाईल.

अर्थशॉट प्राईझ 2026 चे अंतिम स्पर्धक म्हणून झालेल्या महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीच्या प्रवासाविषयी अधिक
जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या: https://earthshotprize.org/winners-finalists/mahindra-last-mile-
mobility/

Comments are closed.