NGN News
Latest Marathi News

टीव्हीएस मोटरकडून टीव्हीएस ज्युपिटर ड्युअल टोनस्पेक्ट्रल रेंज सादर

·         110सीसी सेगमेंटमध्ये ड्युअल टोन स्टायलिंगमध्ये वैशिष्ट्यपूर्ण स्पेक्ट्रल रंग सादर करणारी टीव्हीएस ज्युपिटर पहिली बाईक ठरली आहे.

·         वैशिष्ट्यांमध्ये सेगमेंटमधील पहिले सिक्वेन्शियल टर्न सिग्नल लॅम्प्स (टीएसएल), प्रीमियम आरामदायी सुविधा आणि यूएसबी टाइप- सी चार्जिंग.

 नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

टीव्हीएस वेणूचा एक भाग आणि दुचाकी तसेच तीनचाकी वाहन निर्मितीमधील जागतिक आघाडीवरील टीव्हीएस मोटर कंपनीने, आज भारतातील सर्वात प्रगतिशील फॅमिली स्कूटरच्या श्रेणीत नवीन भर घालत, टीव्हीएस ज्युपिटर ड्युअल टोन स्पेक्ट्रल रेंज सादर केली. ही नवीन श्रेणी 110 सीसी स्कूटर सेगमेंटमध्ये स्पेक्ट्रल ब्लू आणि स्पेक्ट्रल कॉपर हे दोन नवीन ड्युअल-टोन स्पेक्ट्रल रंग घेऊन आली आहे. यामुळे टीव्हीएस ज्युपिटर ही या सेगमेंटमधील अशी पहिली स्कूटर ठरली आहे, जी हे वैशिष्ट्यपूर्ण रंग सादर करत आहे. यासोबतच स्टायलिंग, आराम आणि तंत्रज्ञान यातही विचारपूर्वक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीला पूरक असे आतील रंगीत पॅनेल्स, सीटचाही नवीन रंग आणि अंशतः क्रोमचे आरसे, रस्त्यावर एक सुसज्ज आणि आधुनिक अस्तित्व निर्माण करतात.

रायडर आणि मागे बसणाऱ्यासाठी बॅकरेस्ट असलेल्या प्रीमियम लांब सीटसह नवीन व्हेरिएंट दैनंदिन आराम आणि सोय आणखी वाढवते. यात सेगमेंट-मधील पहिलेच सिक्वेन्शियल टर्न सिग्नल लॅम्प्स (टीएसएल) देखील सादर केले आहेत, जे दृश्यमानता वाढवताना एक वैशिष्ट्यपूर्ण लाइटिंग सिग्नेचर देतात,आणि प्रवासात सोईस्कर चार्जिंगसाठी एक यूएसबी टाइप- सी चार्जिंग पोर्ट देखील आहे.स्कूटरमध्ये स्मार्टएक्सकनेक्ट कनेक्टेड तंत्रज्ञानासह, दोन हेल्मेट ठेवण्याची क्षमता असलेली, तिच्या वर्गातील सर्वोत्तम ३३-लीटरची सीटखालील स्टोरेज क्षमता कायम आहे.

या नवीन आवृत्तीबद्दल टीव्हीएस मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कम्युटर आणि ईव्ही व्यवसाय प्रमुख तसेच कॉर्पोरेट ब्रँड आणि मीडिया प्रमुख) अनिरुद्ध हलदार म्हणाले, “शहरी भागातील तरुण भारतीय कुटुंबे नवनवीन अनुभव, डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या संपर्कात येत आहेत, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या (मोबिलिटीच्या) अपेक्षा आणि आकांक्षा बदलत आहेत. भारतातील स्कूटर संस्कृतीच्या प्रवासात टीव्हीएस ज्युपिटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे; लाखो कुटुंबांचे प्रेम आणि विश्वास संपादन करून या स्कूटरने ‘स्कूटर ऑफ इंडिया’ (भारताची स्कूटर) म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. काळाच्या ओघात यात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा आणि नावीन्यपूर्ण बदल करण्यात आले, तरीही कुटुंबांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींशी असलेली बांधिलकी कंपनीने जपली आहे. प्रगत डिझाइन आणि वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा या स्कूटरचा वारसा पुढे नेत, नवीन ‘टीव्हीएस ज्युपिटर ड्युअल-टोन’ अधिक आधुनिक रूप घेऊन आली आहे. यात या श्रेणीतील (सेगमेंटमधील) प्रथमच सादर केलेली ‘स्पेक्ट्रल कलर्स’ आणि ‘सिक्वेन्शियल टर्न सिग्नल लॅम्प्स’ यांसारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. या सर्व सुधारणांमुळे, आजच्या आधुनिक आणि नव्या युगातील कुटुंबांसाठी प्रवासाचे पसंतीचे साधन बनण्याच्या टीव्हीएस ज्युपिटरच्या वचनबद्धतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.”

टीव्हीएस ज्युपिटरने नेहमीच भारतीय कुटुंबांना अधिक काहीतरी देण्यावर भर दिला आहे. ‘ज्यादा का फायदा’ या तत्त्वज्ञानाचा आधार घेत, नवीन ‘ड्युअल-टोन स्पेक्ट्रल रेंज’ दैनंदिन रायडिंगच्या अनुभवातील प्रत्येक पैलू अधिक समृद्ध करून हे तत्त्वज्ञान पुढे नेते. गेली 13 वर्षांहून अधिक काळ, भारतीय कुटुंबांच्या बदलत्या गरजांनुसार या ब्रँडने स्वतःमध्ये सुधारणा केल्या आहेत. आणि अर्थपूर्ण नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सातत्याने गुणवत्तेचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

2024 मध्ये सादर झालेल्या टीव्हीएस ज्युपिटरने आपला वारसा अधिक समृद्ध केला आहे. यात आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम आणि या विभागातील प्रथम अशी 29 वैशिष्ट्ये आहेत. यात पूर्वीप्रमाणेच प्रगत 113.3 सीसी, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे, जे 5.9 केडब्ल्यू पॉवर आणि टीव्हीएस आयगो असिस्ट सह 9.8 एनएम पर्यंत टॉर्क निर्माण करते; यामुळे इंधनाची कार्यक्षमता सुधारण्यासोबतच अधिक दमदार वेग मिळतो.

टीव्हीएस ज्युपिटरची नवीन ‘ड्युअल-टोन स्पेक्ट्रल’ श्रेणी लवकरच अधिकृत टीव्हीएस मोटर डीलरशिप्सकडे 89,825 (एक्स-शोरूम दिल्ली) या किमतीत उपलब्ध होईल.

Comments are closed.