NGN News
Latest Marathi News

डीएसपी ऍसेट मॅनेजर्सतर्फे कोमल नारंग वितरण विभाग प्रमुखपदी नियुक्त

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

डीएसपी ऍसेट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेडने (डीएसपीएमएम) कंपनीच्या वितरण प्रमुखपदी कोमल नारंग यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा आज येथे केली. त्यांची उषा नायर यांच्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. उषा नायर या सेवाकाल पुर्ण झाल्याने डीएसपीमधून निवृत्त झाल्या आहेत. त्यांचाकडून पदभार स्वीकारणाऱ्या कोमल नारंग आपल्या नवीन भूमिकेत डीएसपी ऍसेट मॅनेजर्सच्या वितरण धोरणाची धुरा सांभाळणार आहे. त्या भारतातील गुंतवणूकदारांसाठी कंपनीच्या गुंतवणूक योजना अधिक व्यापक प्रमाणात उपलब्ध होण्यावर भर देणार आहेत. तसेच फंड वितरकांबरोबरील संबंध अधिक दृढ करण्यावर आपले लक्ष केंद्रीत करणार आहेत.कोमल नारंग यांना वित्तीय क्षेत्राचा तब्बल दोन दशकांपेक्षा अधिक कालावधीचा अनुभव आहे. वितरण, विक्री गटाचे नेतृत्व, ग्राहकांशी अधिकाधिक संवाद साधणे आणि नवीन व्यवसाय विकसित करणे आदींचा त्यांना सखोल अनुभव आहे. डिएसपीएएममध्ये दाखल होण्यापुवी त्या जिओब्लॅकरॉक म्युच्यूअल फंडात कार्यरत होत्या. तेथे त्यांनी चीफ क्लायंट ऑफिसर पदाची जबाबदारी सांभाळताना विक्री, विपणन आणि डिजीटल माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला होता.

जिओब्लॅकरॉकमध्ये काम करण्यापूर्वी, कोमल नारंग या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ऍसेट मॅनेजमेंटमध्ये दहा वर्षांपेक्षा अधिक काळ विविध पदांवर कार्यरत  होत्या. तेथे त्यांनी ग्राहकांशी संवाद वाढविणे आणि व्यवसायाचा विकास साधणे या क्षेत्रांमध्ये वरिष्ठ नेतृत्व पदे भूषवली. ग्राहक सहभाग विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या सर्वात अलीकडील भूमिकेत त्यांनी एएमसीचा बीटूसी व्यवसाय उभारला आणि त्याचे नेतृत्व केले. त्याआधी त्यांनी व्यवसाय विकास प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळतना वितरण प्रणाली व्यवस्थेचे नेतृत्व केले होते.आपल्या करिअरच्या प्रारंभी, कोमल यांनी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्समध्ये विक्री आणि वितरण क्षेत्रात नेतृत्व पदे भूषवली आहेत. त्यांनी कोटक लाईफ इन्शुरन्स आणि इंडियाबुल्ससोबतही काम केलेले आहे.

डीएसपी ऍसेट मॅनेजर्समध्ये कोमल नारंग कंपनीच्या वितरण धोरणाचे नेतृत्व करणार आहेत. त्या विविध माध्यमांचा वापर करत धोरणात्मक भागीदारी करणे तसेच वितरण प्रणालीला बळकटी देणार आहेत. डीएसपी संपूर्ण भारतात आपला विस्तार करत असताना, वितरणासाठी विविध घटकांशी भागीदारी अधिक बळकट करण्याबरोबरच गुंतवणूकदारांचा सहभाग बळकट करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत.

डीएसपी ऍसेट मॅनेजर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कल्पेन पारेख म्हणाले, “वितरण हे केवळ व्यवसाय वाढीचे माध्यम नाही, तर ते आमच्या भागीदारांशी  दीर्घकालीन संबंध निर्माण करत गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याचा मार्ग आहे. गुंतवणूकदारांच्या गरजा बदलत असताना वितरण साखळीला मदत करण्याची आणि त्यांच्याशी जोडण्याची पद्धत आता बदलली पाहिजे.आमचा ‘डिस्ट्रीब्यूटर सक्सेस फ्रेमवर्क’ उपक्रम हा केवळ जाहिराती किंवा मोहिमांपुरता मर्यादित नाही. या उपक्रमाद्वारे आम्ही आमच्या भागीदारांना व्यवसायातील प्रत्यक्ष आव्हाने सोडवण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना व्यावहारिक विपणनप्रणाली अंगीकारण्यास मदत करतो. जेव्हा आपण वितरकांना त्यांचा व्यवसाय अधिक मजबूत करण्यास मदत करतो, तेव्हाच आपले नाते अधिक घट्ट आणि दीर्घकाळ टिकाऊ बनते, या साध्या विचारावर हे सहाय्य आधारलेले आहे. कोमल यांच्याकडे वितरण, ग्राहकांचा सहभाग वाढविणे आणि व्यवसाय विकासाचा मोठा अनुभव आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली ही संकल्पना भारतातील अधिकाधिक भागीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत.”

डीएसपी ऍसेट मॅनेजर्सच्या वितरण विभागाच्या प्रमुख कोमल नारंग नव्या जबाबदारीबद्दल बोलताना म्हणाल्या, “डीएसपीची दीर्घकालीन आणि गुंतवणूकदारांना प्राधान्य देणारी विचारसरणी मला खूप भावली आहे. गुंतवणूकदारांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात आमच्या वितरकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. माझी भूमिका केवळ गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित नाही; तर कंपनीचे गुंतवणुकीचे कौशल्य, अनुभव आणि गुंतवणूकदारांच्या गरजांची समज याव्दारे भागीदारांना, वितरकांना मदत करणे हेदेखील आपले कर्तव्य आहे, ही माझी विचारधारा आहे.गुंतवणूकदार आणि वितरकांशी कंपनीचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी, गुंतवणुकीचे पर्याय अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना एक उत्तम व सातत्यपूर्ण अनुभव मि‌ळण्यासाठी मी आमच्या वितरकांसोबत अधिक जव‌ळून काम करण्यास उत्सुक आहे. डीएसपीच्या या वाढीच्या टप्प्यावर त्यांच्यासोबत वाटचाल करण्याचा आणि मजबूत वितरण प्रणाली तयार करण्यासाठी योगदान देण्याची संधी मिळाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे.”

Comments are closed.