NGN News
Latest Marathi News

क्रिएटिव्ह माईंड स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : क्रिएटिव्ह माईंड स्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रकाश पांगम, सुधाकर बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष तसेच आश्रय ट्रस्ट, ठाणेचे आरोग्य सचिव, श्रीमती अरुणा जठार, सुधाकर बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा, प्राजक्ता जठार, सुधाकर आय क्लिनिकच्या अध्यक्षा, सुनील जठार, सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव तसेच अनुराधा धोंडगे, उत्कृष्ट कवयित्री, लेखिका व अभिनेत्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त क्रिएटिव्ह माईंड स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सुंदर देशभक्तीपर भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांचा संदेश देण्यात आला.

15 ऑगस्टचे औचित्य साधून शाळेच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला शाळेतील पालक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात आणखी भर पडली.

विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजविण्यासोबतच समाजाप्रती आपली जबाबदारी आणि सेवाभावाची जाणीव निर्माण करण्याचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Comments are closed.