NGN News
Latest Marathi News

क्रोमाचे नवे कॅम्पेन ‘घर बनता है क्रोमा से’: घराला ‘घरपण’ देणाऱ्या सुंदर क्षणांचा सोहळा

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

टाटा समूहातील एक ब्रँड आणि भारतातील विश्वासार्ह ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर ‘क्रोमा’ने भारतीय कुटुंबांसोबतचे आपले घट्ट नाते अधोरेखित करणारी ‘घर बनता है क्रोमा से’ ही नवीन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम अशा नात्यांना, संवादांना आणि आठवणींना समर्पित आहे, ज्या एका साध्या वास्तूचे रूपांतर एका सुंदर व जिवंत घरात करतात.

आजचे आधुनिक भारतीय घर झपाट्याने बदलत आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणे या केवळ चैनीची वस्तू राहिलेल्या नसून, ती आपली जीवनशैली, आराम आणि सोयीसुविधा ठरवणाऱ्या आवश्यक गरजा बनल्या आहेत. याच बदलाच्या अनुषंगाने, ही मोहीम ग्राहकांसमोर क्रोमाची भूमिका केवळ वस्तू विकणारे स्टोर म्हणून नव्हे, तर आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांमध्ये कुटुंबांना योग्य दिशा दाखवणारा एक विश्वासू सल्लागार म्हणून मांडते.

क्रोमाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अमित अगरवाल म्हणालेआमच्या २० वर्षांच्या प्रवासात क्रोमाला लाखो भारतीय घरांमध्ये पोहोचण्याची संधी मिळाली आहे. तंत्रज्ञान कौटुंबिक जीवनामध्ये कसे एकरूप झाले आहेहे आम्ही अगदी जवळून अनुभवले आहे. प्रत्येक पहिले घरप्रत्येक सण-उत्सव आणि कुटुंबासोबतचे प्रत्येक जेवण एक नवी गोष्ट सांगते. ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करणे आणि त्याचा वापर सोपा करणेहाच क्रोमाचा मुख्य उद्देश आहे आणि तो आमच्या प्रत्येक कामाच्या केंद्रस्थानी असतो. ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना सर्वोत्तम आणि जीवनशैली समृद्ध करणारे आधुनिक तंत्रज्ञान निवडण्यात मदत करणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हे आमचे ध्येय आहे. ‘घर बनता है क्रोमा से’ ही मोहीम याच कहाण्यांना आमचा सलाम आहे. ग्राहकांना आरामआपुलकी आणि आठवणींनी समृद्ध असे घर तयार करण्यात मदत करण्याची जी संधी आम्हाला मिळालीत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी ही मोहीम आहे.”

ही एकात्मिक मोहीम असून डिजिटल, ओटीटी आणि सोशल मीडियावर सर्वत्र चालवली जाईल. त्यासोबतच ऑन-ग्राउंड ॲक्टिव्हेशन्सची देखील जोड दिली जाईल. व्हिडिओतून सांगितल्या गेलेल्या कथेवरील क्रोमाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे, जी देशभरातील ग्राहकांसोबत अधिक गडद भावनिक नाते निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून तीन मन हेलावून टाकणाऱ्या  डिजिटल फिल्म्स प्रस्तुत केल्या आहेत, ज्यात एका तरुण जोडप्याचा प्रवास दाखवला आहे. दैनंदिन वापरातील उपकरणांची निवड कशी आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची पार्श्वभूमी बनते, हे यात सुंदररित्या टिपले आहे. याशिवाय, निवडक क्रोमा स्टोअर्समध्ये वॉशिंग मशीनपासून प्रेरित भव्य कलाकृती उभारल्या जातील. हे आकर्षक रिटेल लँडमार्क्स या मोहिमेत अधिक जिवंतपणा आणतील, स्टोअर्समधील ग्राहकांची संख्या वाढवतील आणि ब्रँडची ओळख अधिक मजबूत करतील.

ही मोहीम ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर साकारण्यात मदत करण्याचे आणि एक विश्वासू भागीदार म्हणून क्रोमाचे स्थान अधिक मजबूत करण्याचे एक नवीन आश्वासन आहे. विशेष ऑफर्स आणि खास क्युरेटेड पॅकेजेससह, ‘घर बनता है क्रोमा से’ ही मोहीम ग्राहकांना त्यांच्या घराची रचना अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत करेल.

कॅम्पेन फिल्म्स पाहण्यासाठी लिंक्सGhar Banta Hai Croma Se films

Comments are closed.