
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक ; सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे शाळेचे संस्थापक डॉक्टर अगस्तीन पिंटो सर, संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाद्वारे दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पर्यावरण सप्ताहाचे औचित्य साधून इयत्ता सहावी व सातवीच्या मुलांसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला तसेच पर्यावरण पूरक अशा घोषणा देत ही पर्यावरण प्रभात फेरी शाळेच्या परिसरातून काढण्यात आली त्यानंतर इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. आठवी नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजूबाजूचा परिसर झाडून स्वच्छ केला. व नागरिकांना ओल्या व सुक्या कचऱ्याचे विभाजन कसे करायचे याचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर पर्यावरणावर आधारित पथनाट्य ही सादर करण्यात आले. पर्यावरण वाचले तरच आपण वाचू असा संदेश विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीतून स्वच्छता अभियानातून दिला.
पर्यावरण सप्ताह निमित्त अनेक स्पर्धा घेण्यात आल्या त्यात निबंध लेखन घोषवाक्य लेखन, निसर्ग चित्र काढणे, पर्यावरणावर आधारित प्रश्न मंजुषा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजूपाटील, विभाग प्रमुख शितल चिंचोलीकर व इतर शिक्षक वृंदांनी प्रयत्न केले. तसे शहरातील गृहरक्षक पथकाचेही सहकार्य लाभले.
Comments are closed.