NGN News
Latest Marathi News

भाजपा पाथर्डी मंडळातर्फे ५ हजार तिरंगा ध्वजांचे वाटप

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात यावा, या उद्देशाने भाजपा पाथर्डी मंडळातर्फे नागरिकांना तब्बल ५ हजार तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात आले.

पाथर्डी मंडळाच्या वतीने परिसरातील विविध भागांमध्ये नागरिकांशी संपर्क साधत तिरंगा ध्वजांचे वितरण करण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात मंडल अध्यक्ष नितीन कुलकर्णी, राम बडोदे, नलिनी दराडे, सुभाष महाले, पंडितराव कडाळे, डॉ. पुष्पा पाटील, उत्तम उघाडे, रूपेश शिंदे, तेजस वाघ, साहेबराव आव्हाड, भारतकुमार वाघ, संदीप दोंदे, प्रेमकुमार फेगडे, माधव शेळके आणि सुजित मोरे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दल नागरिकांमध्ये अभिमान, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. प्रत्येक घरावर तिरंगा आणि प्रत्येक मनात राष्ट्राभिमान, या भावनेने पाथर्डी मंडळातर्फे हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

Comments are closed.